शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
3
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
4
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
5
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
6
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
7
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
8
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
9
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
10
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
11
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
12
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
13
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
14
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
15
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
16
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
17
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
18
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
19
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
20
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
Daily Top 2Weekly Top 5

मनपा कर्मचाऱ्यांना दिवाळी उचलीचे वांदे

By admin | Updated: October 4, 2014 23:55 IST

अधिकारी निवडणुकीत : सत्ताधारी प्रचारात

सांगली : महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना दरवर्षी दिवाळीनिमित्त अ‍ॅडव्हान्स (उचल) दिली जाते. पण यंदा पालिकेची आर्थिक स्थिती पाहता कर्मचाऱ्यांच्या उचलीचे वांदे निर्माण होणार आहे. कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर होत नाहीत, तिथे उचल कशी मिळणार, असा प्रश्नही उपस्थित होत आहे. त्यात वरिष्ठ अधिकारी निवडणूक कामात मग्न आहेत. तर सत्ताधारी व विरोधक आपआपल्या उमेदवारांच्या प्रचाराला लागले आहेत. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना दिवाळीसाठी अडीच हजार ते पाच हजार उचल दिली जाते. ही उचल नंतर त्यांच्या वेतनातून कपात होते. दरवर्षी सुमारे ८० लाख रुपयांची उचल होते. यंदा मात्र महापालिकेवरच आर्थिक सावटाचे ढग दाटले आहेत. गेल्या दीड वर्षापासून जमा-खर्चाचा ताळमेळ बिघडला आहे. एलबीटीच्या उत्पन्नात कमालीची घट झाली आहे. जकातीवेळी आठ ते नऊ कोटी रुपये दरमहा तिजोरीत जमा होत होते. पण एलबीटीत चार ते पाच कोटीपेक्षा अधिक उत्पन्न मिळालेले नाही. त्यात अन्य स्त्रोतातूनही उत्पन्न घटले आहेत. घरपट्टी, पाणीपट्टीची कोट्यवधी रुपयांची थकबाकी आहे. विकासकामांसाठी पैसाच हाती नाही. त्यात ठेकेदारांचे २० कोटी थकित आहेत. कर्मचाऱ्यांना गेल्या सहा महिन्यात वेळेवर पगार मिळू शकलेला नाही. महिन्याअखेरीस कुठे चतुर्थश्रेणीच्या कर्मचाऱ्यांचे पगार होत आहेत. तर त्यावरील श्रेणीतील कर्मचाऱ्यांना पगारासाठी प्रतीक्षा करावी लागते. अशा स्थितीत यंदाही कर्मचाऱ्यांनी उचल देण्याची मागणी केली आहे. एकूणच आर्थिक स्थिती पाहता महापालिकेचे प्रशासन कर्मचाऱ्यांच्या मागणीकडे कितपत लक्ष देईल, याबाबत साशंकता आहे. (प्रतिनिधी)