शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार? ३०००० कोटीवर पोहोचला तेल कंपन्यांचा तोटा; रोज ७०० कोटींचा फटका
2
निदा खानला लपवण्यात AIMIM नगरसेवक सामील?; CM देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले...
3
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
4
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
5
टाटा समुहाचा 'दिग्गज' शेअर बनला रॉकेट; रेखा झुनझुनवालांच्या संपत्तीत एका दिवसात १३०० कोटींची वाढ! खास गिफ्ट देण्याच्या तयारीत कंपनी
6
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
7
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महेश आहेरची पोलीस कोठडीत रवानगी, भाेदू अशाेक खरातशीही कनेक्शन
8
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
9
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
10
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
11
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
12
मुहूर्त ठरला! उद्या सकाळी ११ वाजता विजय होणार तामिळनाडूचा CM; राज्यपालांचे सरकार स्थापनेचे निमंत्रण
13
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
14
Latest Marathi News LIVE: संदेशखाली प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल - शुभेंदू अधिकारी
15
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
16
Video - “तू स्वप्न पूर्ण कर, मी घर सांभाळते”; सुनेच्या पंखांना सासूचं बळ; खाकी वर्दीसाठी धडपड
17
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
18
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
19
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
20
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

पालिकेत राष्ट्रवादीला फुटीचे ग्रहण

By admin | Updated: March 13, 2015 23:56 IST

इस्लामपुरात आगामी निवडणुकीत : एक नेता, दोन गट होण्याचे संकेत

अशोक पाटील - इस्लामपूर  पालिकेतील सत्ताधारी राष्ट्रवादीला फुटीचे ग्रहण लागले असून, आगामी पालिका निवडणुकीपर्यंत माजी ग्रामविकासमंत्री आमदार जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखालीच दोन गट पडणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
नगरपालिकेतील एम. डी. पवार यांची सत्ता उलथवून टाकण्यासाठी सुरुवातीला पाटील पार्टी आणि नंतर नागरिक संघटनेच्या झेंड्याखाली विरोधक एकवटले होते. त्यातील बहुतांश आता राष्ट्रवादीच्या झेंड्याखाली कार्यरत आहेत. पालिकेत विरोधी पक्षनेते विजय कुंभार असले तरी, विरोधी गटात ताळमेळ नाही. त्यामुळे पालिकेच्या सभागृहात सत्ताधाऱ्यांतच विरोधकांची संख्या वाढू लागली आहे! ज्येष्ठ नगरसेवक बी. ए. पाटील, उपनगराध्यक्ष संजय कोरे, नियोजन सभापती खंडेराव जाधव आणि आता डांगे गटाचे चंद्रकांत पाटील यांनी सत्ताधाऱ्यांनाच लक्ष करून त्यातही पक्षप्रतोद विजयभाऊ पाटील यांच्याविरोधात बोलण्यास सुरुवात केली आहे.
इस्लामपूर पालिकेत सध्या तीन गट कार्यरत आहेत. पक्षप्रतोद विजयभाऊ पाटील यांचा गट प्रबळ मानला जातो. त्यामुळे नगराध्यक्ष कोणीही असो, कारभारी मात्र विजयभाऊच असतात. ते डोक्यावर बर्फ ठेवून राजकीय खेळी करण्यात तरबेज आहेत. त्यांनी डांगे गटाचे अ‍ॅड. चिमण डांगे, एन. ए. गु्रपचे खंडेराव जाधव यांच्याशी मिळतेजुळते घेतले आहे. संजय कोरे एन. ए. गु्रपचे असले तरी, ते सभागृहात सत्ताधाऱ्यांवर नेहमीच कुरघोड्या करताना दिसतात. अभ्यासू ज्येष्ठ नगरसेवक बी. ए. पाटील पूर्वीपासूनच सत्ताधाऱ्यांचेच विरोधक मानले जातात. त्यामुळे पालिकेतील प्रशासनावर ते नेहमी आगपाखड करताना दिसतात.
ज्यावेळी पालिकेत विरोधकांची ताकद कमी आणि सत्ताधाऱ्यांची ताकद जास्त असते, त्यावेळी सत्ताधाऱ्यांतच फूट पडते, असा पालिकेतील राजकीय इतिहास आहे. नागरिक संघटनेतून अण्णासाहेब डांगे, अशोकदादा पाटील, बी. ए. पाटील बाहेर पडले. त्यांनी शहर सुधार समिती स्थापन केली. पुन्हा ही मंडळी जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत झाली. तशीच परिस्थिती आता निर्माण झाली असून आगामी पालिका निवडणुकीत नेता एक, मात्र गट दोन, अशी अवस्था होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
सध्या जयंत पाटील यांच्याकडे मंत्रीपद नाही. त्यामुळे त्यांची पालिकेवरील पकडही ढिली झाली आहे. याचा फायदा सत्ताधाऱ्यांतील नगरसेवक उठवत आहेत. नगराध्यक्ष सुभाष सूर्यवंशी यांच्याकडे प्रशासनातील बारकावे नसल्याने, त्यांचे नेते विजयभाऊ पाटील म्हणतील तीच पूर्वदिशा, असा कारभार सुरू आहे.
त्यामुळे सत्ताधाऱ्यांतील बी. ए. पाटील, संजय कोरे हे कायद्याच्या चाकोरीतून सत्ताधाऱ्यांवरच कडी करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यातच आता डांगे गटाचे चंद्रकांत पाटील यांनीही सभागृहातून काढता पाय घेतल्याने, भविष्यकाळात राष्ट्रवादीला फुटीचे ग्रहण लागण्याची शक्यता आहे.

सत्ताधाऱ्यांच्या कारभारामुळेच सभात्याग
मंगळवारी झालेल्या पालिकेच्या सर्वसाधारण सभेत खुल्या नाट्यगृहाच्या नामकरणाचा विषय आला. या विषयपत्रिकेत जयंत पाटील आणि अशोकदादा पाटील यांचे नाव देण्याच्या नामकरण ठरावात दोन विषय करण्यात आले होते. वास्तविक असे करण्याची गरज नव्हती. त्यामुळे अशोकदादा पाटील यांच्या नावाची अवहेलना झाली. त्यातूनच आपण सभागृहाचा त्याग केला, असे मत डांगे गटाचे नगरसेवक चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.