सांगलीत खुनातील संशयितावर खुनी हल्ला, हल्लेखोर पसार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 29, 2024 11:43 IST2024-02-29T11:43:42+5:302024-02-29T11:43:58+5:30

सांगली : येथील पोलिस रेकाॅर्डवरील गुन्हेगार प्रशांत विश्वनाथ कदम (वय ४०, रा. खणभाग) याच्यावर खणभागातील बदाम चौक परिसरात रात्री ...

Murderous assault on a criminal on police record in sangli | सांगलीत खुनातील संशयितावर खुनी हल्ला, हल्लेखोर पसार

सांगलीत खुनातील संशयितावर खुनी हल्ला, हल्लेखोर पसार

सांगली : येथील पोलिस रेकाॅर्डवरील गुन्हेगार प्रशांत विश्वनाथ कदम (वय ४०, रा. खणभाग) याच्यावर खणभागातील बदाम चौक परिसरात रात्री दहाच्या सुमारास खुनी हल्ला करण्यात आला. तो गंभीर जखमी असून सिव्हिलमध्ये अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

प्रशांत हा २००९ मधील एका खुनातील संशयित आहे. तो खणभागातील दारूगल्लीत रात्री आला होता. तेव्हा त्याच्या पाठलागावर असलेल्या हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने खुनी हल्ला केला. त्यानंतर हल्लेखोर अंधारात पळाले. जखमी प्रशांतला नागरिकांनी सिव्हिलमध्ये उपचारास दाखल केले. हल्ला झाल्याची माहिती मिळताच सांगली शहर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी गर्दी जमली होती. पोलिसांनी परिसरातील काही जणांकडे हल्ल्याबाबत चौकशी केली.

दरम्यान, जखमी प्रशांतला सिव्हिल रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्याच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले. हल्ल्याची माहिती मिळताच प्रशांतचे नातेवाईक व मित्र सिव्हिलमध्ये मोठ्या संख्येने जमले होते. हल्ल्याचे नेमके कारण समजू शकले नाही. रात्री उशिरापर्यंत हल्लेखोरांचा शोध सुरू होता. घटनास्थळी पोलिस निरीक्षक संजय मोरे व पथकाने भेट दिली.

Web Title: Murderous assault on a criminal on police record in sangli