सलगरेत वृद्ध महिलेचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:28 IST2021-09-25T04:28:09+5:302021-09-25T04:28:09+5:30

वत्सला जाधव या कोंगनोळी -सलगरे रस्त्यावर रेल्वे पुलालगत अशोक बाळू जाधव यांच्या शेताजवळ जाधव वस्ती येथे राहत होत्या. मूलबाळ ...

Murder of an old woman in a row | सलगरेत वृद्ध महिलेचा खून

सलगरेत वृद्ध महिलेचा खून

वत्सला जाधव या कोंगनोळी -सलगरे रस्त्यावर रेल्वे पुलालगत अशोक बाळू जाधव यांच्या शेताजवळ जाधव वस्ती येथे राहत होत्या. मूलबाळ नसल्याने व पतीचे निधन झाल्याने त्या घरी एकट्याच होत्या. वस्तीवरच पुतण्या नंदकुमार जाधव याचेही घर आहे.

गुरुवारी रात्री वत्सला झोपल्या होत्या. शुक्रवारी सकाळी त्या घरात नसल्याचे पुतण्या नंदकुमारच्या निदर्शनास आले. त्याने परिसरात पाहणी केली; पण त्या आढळून आल्या नाहीत. यानंतर नागरिकांनी इतर ठिकाणी शोधाशोध केली असता जाधववस्तीकडे जाणाऱ्या मार्गावर त्यांचा मृतदेह आढळून आला. यानंतर घटनेची माहिती कवठेमहांकाळ पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला व मृतदेह शवविच्छेदनासाठी कवठेमहांकाळला पाठविला.

अज्ञाताने वत्सला यांच्या डोक्यात शस्त्राने वार करून ठार केले. यानंतर त्यांचा मृतदेह जाधववस्तीकडे जाणाऱ्या मार्गावर टाकला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. कवठेमहांकाळचे पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सागर गोडे तपास करीत आहेत.

चाैकट

कारण अस्पष्ट

वत्सला जाधव यांच्या खुनाच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. खून नेमका कशामुळे झाला असावा याबाबतचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. मात्र या प्रकरणाचा तपास सर्व बाजूंनी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title: Murder of an old woman in a row