Sangli: एरंडोलीत तरुणाचा निर्घृण खून, अनैतिक संबंधातून खुनाचा संशय 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2024 11:42 IST2024-09-25T11:42:29+5:302024-09-25T11:42:38+5:30

मिरज : एरंडोली (ता. मिरज) येथे प्रमोद ऊर्फ पिन्या वसंत जाधव (वय ३२) तरुणाचा निर्घृणपणे खून करण्यात आला. अनैतिक ...

murder of youth in Erandoli Sangli suspicion of murder due to immoral relationship  | Sangli: एरंडोलीत तरुणाचा निर्घृण खून, अनैतिक संबंधातून खुनाचा संशय 

Sangli: एरंडोलीत तरुणाचा निर्घृण खून, अनैतिक संबंधातून खुनाचा संशय 

मिरज : एरंडोली (ता. मिरज) येथे प्रमोद ऊर्फ पिन्या वसंत जाधव (वय ३२) तरुणाचा निर्घृणपणे खून करण्यात आला. अनैतिक संबंधातून प्रमोद याचा खून झाल्याचा संशय आहे. प्रमोद याच्या मानेवर, छातीवर धारदार हत्याराने वार करून खून केल्याचे मंगळवारी रात्री उशिरा निदर्शनास आले.

एरंडोली येथील जाधव वस्तीवर राहणारा अविवाहित प्रमोद जाधव याचे गावातीलच एका महिलेसोबत अनैतिक संबंध होते. प्रमोद याचे शेती कामासाठी बैल होते. मंगळवारी सायंकाळी आरग रस्त्यावर असणाऱ्या वनीकरणामध्ये तो गेला होता. यावेळी त्याच्यावर पाळत ठेवून हल्लेखोरांनी धारदार हत्याराने त्याच्यावर हल्ला चढविला. प्रमोद याच्या मानेवर व छातीवर धारदार हत्याराने हल्ला केल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. सायंकाळी घरातून बाहेर पडलेला प्रमोद रात्री उशिरापर्यंत घरी न आल्याने त्याच्या नातेवाईकांनी शोध सुरू केला. 

यावेळी आरग रस्त्यावर असणाऱ्या वनीकरणातील झुडुपात त्याचा मृतदेह सापडला. मानेवर व छातीवर चाकूसारख्या धारदार हत्याराने वार करून प्रमोद यास निर्दयीपणे ठार मारण्यात आले. अनैतिक संबंधातून प्रमोद याचा खून झाल्याचा संशय असून, त्या दृष्टीने पोलिसांनी तपास सुरू केला आहे.प्रमोद याच्या खुनाची माहिती मिळताच ग्रामीण पोलिस निरीक्षक भैरू तळेकर यांच्यासह पोलिस फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला.

Web Title: murder of youth in Erandoli Sangli suspicion of murder due to immoral relationship