शहरं
Join us  
Trending Stories
1
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
2
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
3
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
4
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
5
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
6
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
7
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
8
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
9
नीचभंग विपरीत धनयोग: ६ राशींना चांगले दिवस, नोकरीत यश-प्रगती; अडकलेले पैसे मिळतील, लाभ काळ!
10
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
11
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
12
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
13
सकाळी फ्रेश अन् दुपारी चेहरा निस्तेज, केसही खराब? ऑफिसमधील AC ठरतोय तुमच्या सौंदर्याचा शत्रू
14
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
15
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
16
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
17
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
18
भोंदू मनोहर भोसलेचा मुक्काम वाढला; माढा न्यायालयाने सुनावली तीन दिवसाची पोलीस कोठडी
19
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
20
"आता हा दिग्दर्शन करणार, बघू काय दिवे लावतो...", रितेशने सांगितली दिग्दर्शनाच्या निर्णयामागची गोष्ट
Daily Top 2Weekly Top 5

आयुक्तांच्या घरी पालिकेचे कर्मचारी

By admin | Updated: August 4, 2015 23:33 IST

महापौरांचे स्टिंग आॅपरेशन : ४४ कर्मचारी गैरहजर; ५४ जणांची पगारकपात

सांगली : महापालिकेचे आयुक्त अजिज कारचे यांच्या गुलमोहर कॉलनीतील बंगल्यावर त्यांच्या अनुपस्थितीत महापालिकेचे तीन कर्मचारी त्याठिकाणी राबत होते. महापौर विवेक कांबळे यांनी मंगळवारी केलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये ही बाब उजेडात आली. या मोहिमेत विविध विभागांचे ४४ कर्मचारी गैरहजर असल्याचे तसेच १0 कर्मचारी ओळखपत्राशिवाय काम करीत असल्याचे निदर्शनास आले. या सर्व कर्मचाऱ्यांचा एक दिवसाचा पगार कपात करण्याचे आदेश महापौरांनी प्रशासनाला दिले. सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेतील कर्मचाऱ्यांच्या बेशिस्तपणाचे दर्शन महापौरांनी केलेल्या स्टिंग आॅपरेशनवेळी दिसून आले. त्यांनी काही नगरसेवक व वरिष्ठ अधिकाऱ्यांना सोबत घेऊन विविध विभागांची झाडाझडती घेतली. अनेक कर्मचारी हजेरी लावून गायब झाल्याची बाब समोर आली. कोणतीही पूर्वसूचना न देता अनेकजण गैरहजर होते. काहींनी ओळखपत्र जवळ बाळगले नव्हते. नियुक्तीच्या ठिकाणी काम न करता काहीजण फिरत असल्याचेही दिसून आले. अशा सर्व कर्मचाऱ्यांची, अधिकाऱ्यांची यादी महापौरांनी तयार करण्यास सांगितली. त्यानुसार ५४ कर्मचारी विविध कारणांनी कारवाईस पात्र ठरले आहेत. त्यांचा एक दिवसाचा पगार कपात करण्याची सूचना महापौरांनी दिली आहे. महापालिका आयुक्तांच्या बंगल्यात काम करणाऱ्या पालिकेच्या कर्मचाऱ्यांची माहितीही या मोहिमेमधून महापौरांना मिळाली. त्यांनी याबाबत कामगार अधिकारी व प्रशासन अधिकाऱ्यांकडे विचारणा केली. आयुक्त मुंबईला गेले असताना त्यांच्या अनुपस्थितीत महापालिकेचे कर्मचारी त्यांच्या बंगल्यावर कशासाठी थांबले होते? महापालिकेचे कर्मचारी त्यांच्या खासगी कामासाठी आहेत का?, असा सवालही त्यांनी केला. त्यावर अधिकारी निरुत्तर झाले होते. त्यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले. कारवाई झालेले कर्मचारी पुन्हा गैरहजर राहिले, तर त्यांच्या विभाग प्रमुखांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा कांबळे यांनी पत्रकारांशी बोलताना दिला. (प्रतिनिधी)अधिकारीही गैरहजरकर्मचाऱ्यांबरोबरच नगरअभियंता आर. पी. जाधव व एच. ए. दीक्षित हेसुद्धा गैरहजर होते. त्यांच्यावरही कारवाई करण्याचे आदेश महापौरांनी यावेळी दिले. घरपट्टी विभागातील तीन महिला कर्मचाऱ्यांनी एप्रिलपासून हजेरीपुस्तकावर स्वाक्षऱ्याच केल्या नसल्याची बाब या मोहिमेतून समोर आली. त्यामुळे या कर्मचाऱ्यांवरही कारवाईचे आदेश देण्यात आले. कारवाई झालेले महापालिकेचे कर्मचारीविभाग कर्मचारी संख्या नगरसचिव२सुवर्ण जयंती योजना३मागासवर्गीय समिती६लेखा विभाग ६ड्रेनेज १यंत्रशाळा १पाणीपुरवठा १९घरपट्टी १६