मुंबईतील रेल्वे तिकिटांचा मिरजेतून काळाबाजार, दक्षता पथकाने एजंटास पकडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2026 13:24 IST2026-03-07T13:24:32+5:302026-03-07T13:24:59+5:30

त्याच्या मोबाईलमध्ये सुमारे ५० हजार रुपयांच्या तत्काळ आरक्षित तिकिटांचा साठा आढळला.

Mumbai railway tickets black marketed through Miraj, vigilance team catches agent | मुंबईतील रेल्वे तिकिटांचा मिरजेतून काळाबाजार, दक्षता पथकाने एजंटास पकडले

मुंबईतील रेल्वे तिकिटांचा मिरजेतून काळाबाजार, दक्षता पथकाने एजंटास पकडले

मिरज : मुंबईतून उत्तर भारतात जाणाऱ्या रेल्वेगाड्यांची तिकिटे मिरजेत काढली जात असल्याचे उघडकीस आले आहे. मध्य रेल्वेच्यामुंबईतील दक्षता पथकाने मिरज रेल्वे स्थानकात तत्काळ आरक्षित तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या एका अल्पवयीन आरोपीस शुक्रवारी रंगेहाथ पकडले. त्याच्या मोबाईलमध्ये सुमारे ५० हजार रुपयांच्या तत्काळ आरक्षित तिकिटांचा साठा आढळला.

उन्हाळी सुटीच्या पार्श्वभूमीवर आरक्षित रेल्वे तिकिटांना मोठी मागणी आहे. या संधीचा फायदा घेत मिरज जंक्शन येथे आरक्षित तिकिटांचा काळाबाजार सुरू आहे. मुंबईतून उत्तर भारतात जाणाऱ्या रेल्वे गाड्यांना प्रचंड गर्दी असल्याने या गाड्यांची आरक्षण तिकिटे गेल्या काही महिन्यांपासून मिरजेतून काढण्यात येत असल्याचे रेल्वे सुरक्षा दलाच्या दक्षता पथकास निदर्शनास आले.

पथकाने शुक्रवारी सकाळी मिरज रेल्वे स्थानकात छापा टाकून आरक्षित तिकीट काउंटरवर आरक्षित तिकीट काढत असलेल्या एका अल्पवयीन युवकास ताब्यात घेतले. चौकशीत तो बऱ्याच दिवसांपासून अवैध मार्गाने आरक्षित तिकिटे काढून त्यांची विक्री करत असल्याचे उघड झाले.

दक्षता पथकाने आरोपीच्या मोबाईलची तपासणी केली असता त्यात सुमारे ५० हजार रुपयांची आरक्षित तिकिटे आढळून आली. संबंधित एजंटाने काही दिवसांतच सुमारे लाख रुपयांच्या तिकिटांची विक्री केल्याचेही दिसून आले.

संबंधित आरोपी अल्पवयीन असल्याने त्याच्याविरुद्ध मिरज रेल्वे सुरक्षा दलात गुन्हा नोंदवून त्याची सुटका करण्यात आली. या प्रकरणात मुंबई व मिरजेतील आणखी कोणाचा सहभाग आहे का याबाबतही तपास सुरू असल्याची माहिती दक्षता पथकाने दिली.

Web Title : मिराज में मुंबई की ट्रेन टिकटों का काला बाजार; एजेंट गिरफ्तार

Web Summary : मिराज में मुंबई जाने वाली ट्रेन टिकटों की कालाबाजारी करते हुए एक नाबालिग को गिरफ्तार किया गया। उसके पास ₹50,000 मूल्य के आरक्षित टिकट थे। रैकेट में शामिल अन्य लोगों का पता लगाने के लिए जांच जारी है।

Web Title : Mumbai Train Ticket Black Market Busted in Miraj; Agent Arrested

Web Summary : A minor was arrested in Miraj for black marketing Mumbai-bound train tickets. He possessed ₹50,000 worth of reserved tickets. Investigations are ongoing to uncover others involved in the racket.