शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
2
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
3
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
4
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
5
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
6
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
7
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
8
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
9
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
10
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
11
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
12
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
13
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
14
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
15
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
16
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
17
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
18
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
19
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
20
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
Daily Top 2Weekly Top 5

पहिल्या अपत्यासाठी मातांना मिळणार पाच हजार रुपये!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : प्रसूती कालावधीत महिलांना पूरक आहाराबरोबरच योग्य उपचार मिळावेत व त्यांनी आहाराकडे विशेष लक्ष द्यावे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : प्रसूती कालावधीत महिलांना पूरक आहाराबरोबरच योग्य उपचार मिळावेत व त्यांनी आहाराकडे विशेष लक्ष द्यावे यासाठी शासनाकडून विविध अभियान राबविले जातात. यात साधनांची उपलब्धता व्हावी व बाळ सदृढ व्हावे या हेतूने सुरू करण्यात आलेल्या प्रधानमंत्री मातृवंदना योजनेतून गरोदर मातांना अनुदान मिळत असून गेल्यावर्षी जिल्ह्यात उद्दिष्टांपेक्षा अधिक मातांना लाभ देण्यात आला होता.

एकात्मिक बालविकास प्रकल्पाच्या माध्यमातून ही योजना राबविण्यात येते. सध्या १ ते ७ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात प्रधानमंत्री मातृ वंदना सप्ताहाचेही आयोजन करण्यात आले आहे. योजनेतून जिल्ह्यासाठी २०१७ पासून मार्च २०२२ पर्यंत शहर व ग्रामीण भाग मिळून ८२ हजार ३९३ उद्दिष्ट देण्यात आले हाेते. यापैकी सध्या ७१ हजार ३१६ लाभार्थींना योजनेचा लाभ देण्यात आला आहे. ९६ टक्क्यांपेक्षाही जास्त महिलांना याचा लाभ मिळाला आहे. योजनेत नोंद केलेल्या महिलांना ३५ कोटी १ लाख ७८ हजार रुपयांचा निधी थेट लाभार्थींच्या खात्यावर वर्ग करण्यात आला आहे.

प्रथम गरोदर मातांना योजनेचा लाभ मिळण्यासाठी नियोजन करण्यात येत आहे. या सप्ताहात योजनेचे लाभार्थी वाढविण्याबरोबरच त्यांना लाभ देण्यासाठी प्रशासनाने उपक्रम ठेवले आहेत.

चौकट

तीन टप्प्यांत मिळणार पैसे

योजनेचा लाभ घेण्यासाठीची पात्रता पहिले अपत्य असून हा निकष पूर्ण करणाऱ्या महिलेला ५ हजार रुपयांचे अनुदान तीन टप्प्यात दिले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात १ हजार, दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यात प्रत्येकी २ हजार थेट खात्यावर जमा होतात.

चौकट

पात्रतेचे निकष काय?

योजनेचे निकष ठरविताना प्रशासनाने शहरी व ग्रामीण भागातील प्रथम गर्भवती महिला व स्तनदा मातांना हा लाभ मिळणार आहे. पहिल्या जिवंत अपत्यासाठी हा लाभ मिळतो.

चौकट

लाभासाठी कोठे करायचा संपर्क?

प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सेविका, आशा स्वयंसेविकासह आराेग्य व अंगणवाडीच्याही कर्मचाऱ्यांचा यात सहभाग आहे. आरोग्य केंद्र, उपकेंद्र व इतर आरोग्य विभागात संपर्क साधल्यास योजनेची माहिती मिळणार आहे.

कोट

प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचा जास्तीत जास्त महिलांना लाभ व्हावा यासाठी सप्ताह आयोजित केला आहे. यात लाभार्थी निवड व योजनेची माहिती दिली जाणार आहे.

-डॉ. मिलिंद पोरे, जिल्हा आरोग्य अधिकारी