Crime News Sangli: मुलानेच केला जन्मदात्या आईचा खून, संशयित आरोपी मुलास अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2022 16:31 IST2022-05-05T16:30:04+5:302022-05-05T16:31:14+5:30
दारू पिऊन तो आईला मारहाण करत होता. त्यातच आज तुला जिवंत ठेवत नाही असे तो वारंवार म्हणत.

Crime News Sangli: मुलानेच केला जन्मदात्या आईचा खून, संशयित आरोपी मुलास अटक
कवठेमहांकाळ : सुनेच्या मृत्यूनंतर पोटच्या मुलाला व त्याच्या दोन मुलांचा काबाडकष्ट करुन सांभाळ केला, मात्र क्रूरकर्मा मुलानेच आपल्या जन्मदात्या वृद्ध आईचा खून केल्याची घटना कवठेमहांकाळ तालुक्यातील आगळगाव येथे घडली. राजाक्का ज्ञानू जाधव (वय ७०) असे या मृत वृद्ध मातेचे नाव आहे. याप्रकरणी संशयित आरोपी मुलगा दशरथ ज्ञानू जाधव (५०) याला कवठेमहांकाळ पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबत माहिती अशी की, पत्नीच्या मृत्यूनंतर दशरथ हा आपल्या दोन्ही मुलासह आईसोबत राहत होता. राजाक्का या काबाडकष्ट करून त्याचा व त्याच्या दोन मुलांचा सांभाळ करत होत्या. दशरथला दारुचे व्यसन होते. दारू पिऊन तो आईला मारहाण करत होता. त्यातच आज तुला जिवंत ठेवत नाही असे तो वारंवार म्हणत.
काल, बुधवारी, (दि.४) सायंकाळच्या सुमारास त्याने आईला लोखंडी फुकणी व दगडाने मारहाण केली. या मारहाणीत त्या जखमी झाल्या. जखमी राजाक्का उपचारासाठी मिरज शासकीय रुग्णालयाकडे नेले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
दरम्यान, गणेश भोसले यांनी या घटनेबाबात कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. उपविभागीय पोलीस अधिकारी रत्नाकर नवले यांनी घटनास्थळी जाऊन, आरोपी दशरथ जाधव याला काल, बुधवारी रात्री उशिरा ताब्यात घेतले. पुढील तपास पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गोडे करीत आहेत.