Sangli Crime: पत्नीला सासरी का पाठवत नाही म्हणून सासूला मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2026 19:20 IST2026-02-19T19:20:18+5:302026-02-19T19:20:58+5:30

सांगली : सासूरवाडीत येऊन पत्नीला का पाठवत नाही म्हणून दारुच्या नशेत दंगा करून सासूला मारहाण केल्याचा प्रकार संजयनगर परिसरात ...

Mother in law beaten up for not sending wife to in laws in Sangli | Sangli Crime: पत्नीला सासरी का पाठवत नाही म्हणून सासूला मारहाण

संग्रहित छाया

सांगली : सासूरवाडीत येऊन पत्नीला का पाठवत नाही म्हणून दारुच्या नशेत दंगा करून सासूला मारहाण केल्याचा प्रकार संजयनगर परिसरात घडला. याप्रकरणी जखमी सत्यवा बिरु कोकरे (वय ४०, रा. जिल्हा परिषद मराठी शाळा क्र. ४२ जवळ, संजयनगर, सांगली) यांनी संजयनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. जावई राहुल धुळा कोळेकर (वय २९, रा. आदगोंडा प्लॉट, संजयनगर) याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!

अधिक माहिती अशी, संजयनगर येथे राहणाऱ्या फिर्यादी सत्यवा कोकरे यांच्या घरी मंगळवारी दुपारी ३:००च्या सुमारास त्यांचा जावई संशयित राहुल कोळेकर आला. त्याने पूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरुन सत्यवा यांना शिवीगाळ सुरू केली. ‘तुमच्या मुलीला माझ्यासमवेत पाठवून द्या’, असे जोरजोराने ओरडू लागला.

त्यानंतर राहुलने सत्यवा यांच्या मुख्य दरवाजावर दगड फेकून मारले. त्यामुळे सत्यवा या दरवाजा उघडून बाहेर आल्या. तेव्हा राहुलने त्याच्या हातातील लोखंडी कड्याने सत्यवा यांच्या डोक्यात मारून जखमी केले. त्यानंतर तो पसार झाला. जखमी सत्यवा यांनी उपचारानंतर जावई राहुल कोळेकर याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Web Title : सांगली: पत्नी को ससुराल न भेजने पर सास पर हमला

Web Summary : सांगली में एक व्यक्ति ने पत्नी को ससुराल न भेजने पर कथित तौर पर अपनी सास पर नशे में हमला किया। पीड़िता सत्यवा कोकरे ने अपने दामाद राहुल कोलेकर के खिलाफ पुलिस में शिकायत दर्ज कराई है, जिस पर अब आरोप लगाए जा रहे हैं।

Web Title : Sangli: Man assaults mother-in-law for not sending his wife.

Web Summary : A man in Sangli, angered that his mother-in-law wasn't sending his wife, allegedly assaulted her while intoxicated. The victim, Satyava Kokare, filed a police complaint against her son-in-law, Rahul Kolekar, who is now facing charges.