Sangli: घरात झाडलोट करण्याच्या वादातून सासू-सुनेत हाणामारी; दोघीही जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2026 16:00 IST2026-03-21T15:59:01+5:302026-03-21T16:00:32+5:30
परस्परविरोधी फिर्यादी दाखल

संग्रहित छाया
सांगली : स्वयंपाकघर झाडण्यावरून सांगलीत सासू आणि सुनेत जोरदार हाणामारी झाली. त्यात दोघीही जखमी झाल्या. त्यांनी पोलिस ठाण्यात परस्परविरोधी फिर्यादी दाखल केल्या आहेत.
गुरुवारी (दि. १९) सकाळी गावभागात हा प्रकार घडला.
सासू शांताबाई लक्ष्मणराव फलटणकर (वय ७६) यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, सून वर्षा विनायक फलटणकर (वय ४८, दोघीही रा. महाबळ भवनसमोर, बहेकर वाडा, गावभाग, सांगली) हिने सासूला ‘स्वयंपाकघर का झाडले नाही?’ अशी विचारणा केली. यावरून दोघींमध्ये वाद झाला.
यावेळी वर्षाने सासूला शिवीगाळ व मारहाण केली. उजव्या हाताच्या अंगठ्याचा चावा घेतला. तोंडात बोट घालून जोरात ओरखडा काढल्याने रक्त येऊ लागले. रुग्णालयात त्यांच्या जखमेवर टाके घालावे लागले.
दरम्यान, सून वर्षा यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, सासू शांताबाई यांना घर झाडण्यास सांगितले. याचा राग आल्याने त्यांनी मला शिवीगाळ करीत पाठीत मारहाण केली तसेच उजव्या पायावर मारून जखमी केले.