शहरं
Join us  
Trending Stories
1
अग्निमित्रा पॉल यांना दिल्लीतून बोलावणे...! पश्चिम बंगालच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची चर्चा, अमित शाह निवडणार... 
2
Top Marathi News Live: पश्चिम बंगालमध्येही भाजपाचे धक्कातंत्र? मुख्यमंत्रिपदासाठी 'दिल्ली पॅटर्न'?
3
६ राज्ये, १९ जिल्हे आणि ८३ लाख लोकांना थेट फायदा; ₹२३,४०० कोटींमध्ये रेल्वे करणार 'हे' महत्त्वाचं काम
4
पाकिस्तानला अमेरिकेचा मोठा धक्का! सुरक्षेच्या कारणास्तव दूतावास कायमचा बंद केला
5
नसरापूर प्रकरण: …तर राज ठाकरेंवर दाखल होऊ शकतो गुन्हा, असीम सरोदेंचा दावा
6
'प्रोजेक्ट फ्रीडम' बंद, होर्मुझमधील जहाजांना यापुढे सुरक्षा देणार नाही; ट्रम्प यांची मोठी घोषणा
7
'राजा शिवाजी'मध्ये विद्या बालनच्या जागी दिसली असती 'ही' अभिनेत्री, मात्र दिला नकार; कारण...
8
डॉ. संग्राम पाटील यांचा यूकेमध्ये जाण्याचा मार्ग मोकळा; हायकोर्टाने दिला दिलासा, काय म्हटलं?
9
प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितलं इंडस्ट्रीतलं वास्तव, म्हणाली, "किसींग सीनला नकार, थकलेले मानधन..."
10
ममता बॅनर्जी राजीनामा देणार नाहीत, निवडणूक आयोगाने नोटिफिकेशन जारी केले; भाजप सत्ता कशी स्थापन करणार?
11
Palghar Crime: अघोरी पूजेसाठी बोलावले अन् १३ वर्षाच्या मुलीवर भोंदूबाबाने केला बलात्कार, पालघर हादरले
12
Samudrik Shastra: गालावरची खळी: केवळ सौंदर्य की भाग्याचं लक्षण? सामुद्रिक शास्त्र काय सांगते?
13
Multibagger Stock : १ लाखाचे बनले ३ कोटी रुपये; या शेअरनं दिला ३१०००% पेक्षा अधिक रिटर्न, एकेकाळी ₹१० पेक्षा कमी होती किंमत
14
आसाम, बंगालमधील विजयानंतर भाजपा ‘या’ राज्यात ऑपरेशन लोटसच्या तयारीत? बड्या नेत्याने दिले संकेत
15
पंजाबमध्ये हायअलर्ट! जालंधरनंतर अमृतसरमध्येही स्फोट; लष्करी तळ आणि BSF मुख्यालयाजवळ खळबळ
16
ममतांचा किल्ला कसा भेदला? काय होता विजयाचा फॉर्म्युला? भाजपचे चाणक्य अमित शाह यांच्या प्लॅनची ‘इनसाइड स्टोरी’
17
पश्चिम बंगालमध्ये मोठा राडा! भाजपने मध्यरात्री हॉग मार्केटमधील तृणमूल काँग्रेसचे कार्यालय पाडले, बुलडोझर आणला अन्...
18
तामिळनाडूत विजय होणार मुख्यमंत्री; काँग्रेसची पाठिंबा देण्याची तयारी, पण त्याबदल्यात काय हवं?
19
पाकिस्तान नौदलाने मदतीसाठी काश्मीर जहाज पाठविले! अरबी समुद्रात अडकलेल्या ७ भारतीय खलाशांची केली मदत
20
आजचे राशीभविष्य ६ मे २०२६: आर्थिक गुंतवणुकीसाठी अनुकूल दिवस, धनलाभ होण्याची शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

मोहनराव, संग्रामसिंह बाजी मारणार का?

By admin | Updated: April 30, 2015 00:24 IST

जिल्हा बॅँक निवडणूक : दोघांनाही संधी मिळण्याची शक्यता, कडेगाव तालुक्यात चर्चेला उधाण

प्रताप महाडिक -कडेगाव --सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या निवडणुकीत कडेगाव तालुका विकास सोसायटी गटातून कॉँग्रेसचे उमेदवार मोहनराव कदम यांच्याविरोधात भाजपचे धोंडीराम महिंद यांनी दंड थोपटले आहेत. येथे कॉँग्रेसची मोठी ताकद असल्याने कदम बाजी मारतील, अशी शक्यता आहे. क ४ मतदारसंघात शेतकरी पॅनेलमधून संग्रामसिंंह देशमुख निवडणूक लढवित आहेत. येथे मजूर आणि औद्योगिक संस्थांतील जिल्ह्यातील मतदारांशी असलेला देशमुख यांचा संपर्क आणि पाठीशी असलेली राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना आणि कॉँग्रेसमधील मदन पाटील गटाची ताकद, यामुळे देशमुखही बाजी मारतील, अशी शक्यता आहे.बॅँकेच्या संचालक मंडळावर तीन वेळा बिनविरोध आणि एकवेळा निवडणुकीत विजय मिळवून सलग २० वर्षे संचालक असलेले ज्येष्ठ नेते मोहनराव कदम यांच्या नेतृत्वाखाली रयत सहकार परिवर्तन पॅनेल निवडणूक लढवित आहे. कदम यांना तालुक्यातच शह देण्याच्या निर्धाराने शेतकरी सहकारी पॅनेलमधून धोंडीराम महिंद निवडणूक लढवित आहेत. त्यांना काटशह देऊन मोहनराव बाजी मारणार का, याकडे सर्वांचे लक्ष आहे. विकास सोसायटी गटातून ६२ मतदार आहेत. यापैकी बहुतांशी मतदारांची ताकद आपल्या पाठीशी आहे. त्यामुळे येथे निश्चितपणे विजय मिळेल, अशी खात्री कदम व्यक्त करीत आहेत.क्र. ४ मतदारसंघात शेतकरी पॅनेलचे संग्रामसिंंह देशमुख आणि विष्णू माने यांच्या विरोधात रयत सहकार परिवर्तन पॅनेलचे सी. बी. पाटील व विलास बेले उमेदवार आहेत. या गटामध्ये मजूर आणि औद्योगिक संस्थांतील सर्व जिल्ह्यातील जवळपास तीनशेहून अधिक मतदार आहेत. गत निवडणुकीतही संग्रामसिंंह देशमुख यांना याच गटातून संधी मिळाली होती. देशमुख यांचा मतदारांशी असलेला संपर्क आणि पॅनेलची ताकद यामुळे तेही या निवडणुकीत बाजी मारतील अशी चर्चा आहे.कडेगाव तालुक्यात कदम आणि देशमुख यांच्या साखर कारखाने, सहकारी संस्था, सूतगिरण्या यामुळे जिल्हा मध्यवर्ती बॅँकेची उलाढाल वाढली आहे आणि बॅँकेला उर्जितावस्था आली आहे. तालुक्यातील बॅँकेच्या सर्व शाखा प्रगतीकडे वाटचाल करीत आहेत. त्यामुळे तालुक्यातील मोहनराव कदम व संग्रामसिंह देशमुख हे प्रभावशाली नेते जिल्हा बॅँकेच्या संचालक मंडळावर निवडले जातील, अशी शक्यता तालुक्यातील राजकीय जाणकार कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत.मोहनराव कदम २0 वर्षे संचालककॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोहनराव कदम सोसायटी गटातून सलग तीनवेळा बिनविरोध व एकवेळा निवडणूक लढवून जिल्हा बॅँकेच्या संचालक मंडळात काम करीत आहेत. सहकारात मजबूत पायावर उभा असल्याने हे शक्य झाले, असे ते सांगतात. होमग्राऊंडवर त्यांना तब्बल २० वर्षे संचालक म्हणून कामकाजाची संधी मिळाली आहे. आताही संधीची शक्यता व्यक्त होत आहे.