Sangli News: आमदार विक्रम सावंत यांच्या गाडीवर हल्ला, युवक ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2023 12:59 IST2023-02-11T12:59:12+5:302023-02-11T12:59:49+5:30

जत पोलिस ठाण्यात उशिरापर्यंत घटनेची नोंद नाही

MLA Vikram Sawant car attacked, youth detained | Sangli News: आमदार विक्रम सावंत यांच्या गाडीवर हल्ला, युवक ताब्यात

Sangli News: आमदार विक्रम सावंत यांच्या गाडीवर हल्ला, युवक ताब्यात

जत : जत शहरातील एका माथेफिरू युवकाने आमदार विक्रम सावंत यांच्या घरासमोर उभ्या असलेल्या मोटारीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, गाडीचे नुकसान झाले नाही. ही घटना शुक्रवारी दुपारी घडली.

आमदार सावंत हे घरी जेवणासाठी आले होते. त्यांची मोटार घराच्या गेटसमोर उभी होती. यावेळी एका माथेफिरूने झाडांची कुंडी आमदारांच्या गाडीवर फेकली. शेजारील लोकांनी त्या युवकास पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. या हल्ल्यापाठीमागे नेमके कारण समजू शकले नाही. 

घटनास्थळी कार्यकर्ते आणि बघ्यांची गर्दी झाली होती. आमदार सावंत यांनी जत पोलिसांना दूरध्वनीवरून तक्रार दाखल करून घेऊ नये, असे सांगितल्याने जत पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत या घटनेची नोंद झाली नव्हती. हा युवक मनोरुग्ण असल्याचे सांगण्यात आले.

Web Title: MLA Vikram Sawant car attacked, youth detained