ब्राह्मण समाजाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य: अमोल मिटकरी, जयंत पाटील, धनंजय मुंडेंविरोधात मिरजेत तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2022 11:33 IST2022-04-23T11:08:22+5:302022-04-23T11:33:17+5:30

इस्लामपूर येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात मिटकरी यांनी पौरोहित्य करणाऱ्या पुरोहितांबाबत आक्षेपार्ह, निषेधार्ह व खोटे, गैरसमज पसरवणारे वक्तव्य केले.

Miraj complaint against Amol Mitkari, Jayant Patil, Dhananjay Munde | ब्राह्मण समाजाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य: अमोल मिटकरी, जयंत पाटील, धनंजय मुंडेंविरोधात मिरजेत तक्रार

ब्राह्मण समाजाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य: अमोल मिटकरी, जयंत पाटील, धनंजय मुंडेंविरोधात मिरजेत तक्रार

मिरज : राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात ब्राह्मणांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल आमदार अमोल मिटकरी, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध मिरजेत ब्राह्मण समाजातर्फे गांधी चाैक पोलिसांत तक्रार देण्यात आली आहे.

इस्लामपूर येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात मिटकरी यांनी पौरोहित्य करणाऱ्या पुरोहितांबाबत आक्षेपार्ह, निषेधार्ह व खोटे, गैरसमज पसरवणारे वक्तव्य केले. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे या दोघांनी हसून मिटकरी यांना प्रोत्साहन दिले.

राष्ट्रवादी काँग्रेस जातीचे राजकारण करीत असून प्रदेशाध्यक्षांसमोर ब्राह्मण समाजाबद्दल पक्षाचा आमदार खोटी वक्तव्य करतो. प्रदेशाध्यक्ष व इतर मंडळी त्याची मजा घेतात. याबद्दल संबंधितावर गुन्हा दाखल करून कारवाईची मागणी ब्राह्मण परिवाराचे अध्यक्ष ओमकार शुक्ल यांनी गांधी चाैक पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक रविराज फडणीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

यावेळी किशोर पटवर्धन, विनोद गोरे, सुमेध ठाणेदार, अभय आठवले, ओंकार जोशी, निलेश साठ्ये, जयंत सहस्रबुद्धे यांच्यासह ब्राह्मण समाजबांधव उपस्थित होते.

Web Title: Miraj complaint against Amol Mitkari, Jayant Patil, Dhananjay Munde