Sangli: आटपाडीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार, युवकावर गुन्हा दाखल; परिचारिकेचाही सहभाग

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2024 17:59 IST2024-09-10T17:59:38+5:302024-09-10T17:59:53+5:30

आटपाडी : आटपाडी तालुक्यातील एका सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीस चारचाकीमध्ये जबरदस्तीने बसवून आटपाडीच्या तळ्यावर त्याच गाडीमध्ये बलात्कार केल्याची घटना ...

Minor girl raped in Atpadi Sangli, case registered against youth; Nurse also participates | Sangli: आटपाडीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार, युवकावर गुन्हा दाखल; परिचारिकेचाही सहभाग

Sangli: आटपाडीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार, युवकावर गुन्हा दाखल; परिचारिकेचाही सहभाग

आटपाडी : आटपाडी तालुक्यातील एका सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीस चारचाकीमध्ये जबरदस्तीने बसवून आटपाडीच्या तळ्यावर त्याच गाडीमध्ये बलात्कार केल्याची घटना दि. १० ऑगस्ट २०२४ रोजी घडली आहे. याबाबत पीडितेच्या वडिलांनी आरोपी संग्राम देशमुख (रा. आटपाडी) व परिचारिका सुमित्रा लेंगरे (रा. लेंगरेवाडी, ता. आटपाडी) यांच्याविरोधात फिर्याद दिली असून, संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, दि. १० व ११ ऑगस्ट २०२४ रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास पीडितेला आरोपी संग्राम व सुमित्रा हिने जबरदस्तीने लाल रंगाच्या चारचाकीमध्ये बसवून आटपाडी तळ्यावर नेत तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार केला. आरोपी हा जीम चालक आहे. कोणास काही सांगितल्यास बहिणीला व घरच्यांना जीवे मारण्याची धमकी त्याने दिली. पीडितेचे कपडे काढून फोटो व व्हिडीओ चित्रीकरण केले आहे.

उद्या पण आली नाहीस तर काढलेले व्हिडीओ व फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. घटनास्थळी पोलिस निरीक्षक विनय बहिर यांनी भेट दिली. महिला आरोपीला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. सहायक पोलिस निरीक्षक रमेश जाधव अधिक तपास करत आहेत.

Web Title: Minor girl raped in Atpadi Sangli, case registered against youth; Nurse also participates