दूध फॅट मशीनची तपासणी करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:29 IST2021-02-05T07:29:13+5:302021-02-05T07:29:13+5:30

आमदार सुमनताई पाटील व स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले. यावेळी तालुकाध्यक्ष जोतिराम जाधव उपस्थित ...

The milk fat machine should be inspected | दूध फॅट मशीनची तपासणी करावी

दूध फॅट मशीनची तपासणी करावी

आमदार सुमनताई पाटील व स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले. यावेळी तालुकाध्यक्ष जोतिराम जाधव उपस्थित होते.

दिलेल्या निवेदनात त्यांनी सांगितले की, सांगली जिल्ह्यात दररोज चौदा ते पंधरा लाख लीटर दुधाचे संकलन होते. जोडधंदा म्हणून शेतकरी या व्यवसायात आहे. मात्र डेअरी चालकांकडून त्यांची लूट सुरू आहे. शंभर मिली पेक्षा कमी माप नाही. त्यामुळे ९० ते ९५ मिली दूध जादा झाले तरी त्याची किंमत शेतकऱ्यांना मिळत नाही. त्यामुळे ९९ मिली दूध फुकटच डेअरी चालकास जाते. त्यामुळे २५.५० मिलीची वजने करण्याची आवश्यकता आहे. तर फॅट मशीन सेटिंग करून शेतकऱ्यांच्या लुटीची तक्रार केली तर तपासणी करण्याचे अधिकार कोणत्याच यंत्रणेकडे नाहीत. वजन मापे विभागाकडेही ते अधिकार नाहीत. यामुळे दिवसा शेतकऱ्यांची मोठी लूट सुरू आहे. खाजगी डेअरी चौकशी करण्याचा अधिकार सहकार विभागाकडे नाही. याबाबत निर्णय घ्यावा असे सांगत सविस्तर चर्चा केली. यावर मंत्री केदार यांनी सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.

यावेळी रोहित पाटील, बस्तवडेचे उपसरपंच संदेश पाटील, वाळवा तालुका अध्यक्ष भागवत जाधव , युवा आघाडीचे महेश जगताप, यशपाल पाटील आदी उपस्थित होते.

Web Title: The milk fat machine should be inspected