शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
5
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
6
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
7
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
10
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
11
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
12
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
13
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
14
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
15
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
16
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
17
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
18
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
19
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
20
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले

दुष्काळी पट्ट्यातून ४५००० मजुरांचे स्थलांतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2019 2:24 PM

दरवर्षी जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यांतून ऊस तोडणीसाठी स्थलांतरित होणाऱ्या सव्वालाख मजुरांपैकी सुमारे ४५ हजार मजूर दुष्काळामुळे यावर्षी गावाकडे परतलेच नाहीत. हे मजूर सध्या नदीकाठावरील वीटभट्ट्या, बाजारपेठेत हमाली आणि शेतमजुरीची कामे करून पोटाची खळगी भरत आहेत. मात्र जनावरे जगविण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे. काही तरुणांनी रोजगारासाठी गाव सोडून मुंबई, पुणे गाठले आहे.

ठळक मुद्देदुष्काळी पट्ट्यातून ४५००० मजुरांचे स्थलांतरशेतकऱ्यांवर मजुरीला जाण्याची वेळ

अशोक डोंबाळे सांगली : दरवर्षी जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यांतून ऊस तोडणीसाठी स्थलांतरित होणाऱ्या सव्वालाख मजुरांपैकी सुमारे ४५ हजार मजूर दुष्काळामुळे यावर्षी गावाकडे परतलेच नाहीत. हे मजूर सध्या नदीकाठावरील वीटभट्ट्या, बाजारपेठेत हमाली आणि शेतमजुरीची कामे करून पोटाची खळगी भरत आहेत. मात्र जनावरे जगविण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे. काही तरुणांनी रोजगारासाठी गाव सोडून मुंबई, पुणे गाठले आहे.जिल्ह्यात मोठे पाच आणि छोटे ७९ असे ८४ पाझर तलाव आहेत. त्यामध्ये ९४४०.२० दशलक्ष घनफूट पाणीसाठ्याची क्षमता असून, सध्या १५११.७० दशलक्ष घनफूट म्हणजे केवळ ११ टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. मेअखेर शिल्लक पाणी पुरविण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे.

जिल्ह्यातील ४५० गावांवर दुष्काळाचे सावट असून, १८७ गावे आणि १०८८ वाड्या-वस्त्यांवर भीषण पाणीटंचाई आहे. या गावांतील सुमारे चार लाखांहून अधिक लोकसंख्येला १८६ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. जत, आटपाडी या तालुक्यांतील पूर्व भागामध्ये पाणी टंचाई भीषण असून, येथे पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची प्रतीक्षा करावी लागत आहे. सर्वच ठिकाणी दोन ते तीन दिवसांतून एकदा टँकर येत आहे.

काही गावांत टँकरच्या पाण्यामध्ये गैरकारभार होत असल्याच्या तक्रारी आहेत. आटपाडी, जत, कवठेमहांकाळ, तासगाव, खानापूर आणि मिरज पूर्व, कडेगाव तालुक्यातील ४५० गावांमधील शेतकऱ्यांच्या पदरात सलग दोन खरीप आणि रब्बी हंगाम पडले नाहीत. पेरणीनंतर कोवळी पिकेच वाळून गेल्यामुळे शेतकऱ्यांवर मजुरीला जाण्याची वेळ आली आहे.दरवर्षी दुष्काळी तालुक्यांतून सव्वालाख मजूर मिरज, वाळवा, पलूस तालुक्यांसह कोल्हापूर, सातारा जिल्हे आणि कर्नाटक सीमाभागामध्ये ऊस तोडणीसाठी जातात. यावर्षी गावाकडील दुष्काळाचे भीषण वास्तव पाहून जत, आटपाडी, तासगाव, खानापूर, कवठेमहांकाळ तालुक्यातील ऊसतोडीसाठी गेलेल्या मजुरांपैकी ४५ ते ५० हजार मजूर पुन्हा गावाकडे फिरकलेच नाहीत.

जत तालुक्यातून सर्वाधिक ५० ते ६० हजार मजुरांचे स्थलांतर होते. यापैकी ५० टक्के मजूर गावाकडे न जाता नदीकाठावर वीटभट्टी, शेतीच्या मजुरीसाठी मिरज, वाळवा, पलूस तालुक्यात थांबले असल्याचे ऊस तोडणी मुकादम दाजी माने यांनी सांगितले.

जत तालुक्यातील पांढरेवाडी, मोटेवाडी, कुलाळवाडी, आसंगी तुर्क, लकडेवाडी, कागनरी, लमाणतांडा (दरीबडची), लमाणतांडा (उटगी), निगडी बुद्रुक, करेवाडी (तिकोंडी), कारंडेवाडी, टोणेवाडी, मायथळ, पांडोझरी पारधी वस्ती ही गावे ओस पडली आहेत.गावात फक्त वयोवृद्धच वास्तव्यास असल्याचे येथील नागरिकांनी सांगितले. आटपाडी तालुक्यातील करगणी, गोमेवाडी, दिघंची, लिंगीवरे, खरसुंडी, बनपुरी परिसरातील काही तरुणांनी पुणे, मुंबई, सांगली, कोल्हापूर शहराकडे रोजगारासाठी स्थलांतर सुरू केले आहे.

टॅग्स :droughtदुष्काळSangliसांगली