शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

सांगली जिल्हा परिषदेत सत्तेसाठी बैठकांचा सिलसिला सुरू, राष्ट्रवादीला सोबत घेण्यासाठी वाटाघाटी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2026 15:31 IST

शिंदेसेनेचे पत्तेही महत्त्वाचे, पालकमंत्री आज सांगलीत

सांगली : जिल्हा परिषद निवडणुकीत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने वाटाघाटी सुरू झाल्या आहेत. सत्तेचा घट बसविण्यासाठी बैठकांचा सिलसिला सुरू झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला (अजित पवार) सोबत घेण्यासाठी वाटाघाटी सुरू आहेत. शिंदेसेनेचे पत्तेही महत्त्वाचे ठरले आहेत.महाविकास आघाडी आणि भाजप महायुतीला बहुमत नसल्याने कोंडी झाली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीलाही बहुमतासाठी एकच जागा कमी पडत आहे. तर महायुतीचे बहुमत ३१ जागांसह काठावर आहे. अर्थात यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला (अजित पवार) गृहीत धरले आहे. त्यामुळे आघाडीकडून राष्ट्रवादी नेत्यांसोबत चर्चेच्या फेऱ्या सुरू आहेत. भाजपनेही त्यांचा पाठिंबा मिळविण्यासाठी महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा सुरू केल्या आहेत.दरम्यान, भाजप नेते चंद्रकांत पाटील हे बुधवारी सांगलीत आहेत. ते भाजपसह महायुतीच्या नेत्यांशी चर्चा करणार आहेत. बहुमतासाठी अन्य पक्षांसोबतही चर्चा करण्याची शक्यता आहे. सांगलीत विश्रामबागमध्ये त्यांची पक्षीय बैठक होणार आहे.निकालात सर्वाधिक १८ जागा शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसला, भाजप १६, काँग्रेस ११, शिवेसना ७ आणि अजित पवार राष्ट्रवादीला ६ जागा मिळाल्या. तर रयत क्रांती पक्ष आणि जनसुराज्यने प्रत्येकी एक जागा मिळाली आहे. त्यामुळे सत्तेचे त्रांगडे निर्माण झाले आहे.भाजपकडूनही सत्तेसाठी जोरदार फिल्डिंग लावण्यात येत आहे. सांगलीत जिल्हाध्यक्ष सम्राट महाडीक, आमदार सुरेश खाडे, आमदार गोपीचंद पडळकर, सत्यजित देशमुख तसेच पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. महायुतीची मोट बांधण्यासाठी प्रयत्न सुरू केले. सर्व घटक पक्षांना सोबत घ्यावे, असा सूर पक्षनेत्यांचा आहे. सर्वजण एकत्र राहिल्यास महायुतीला सत्ता कायम राखण्यात अडचण नसल्याचे आमदारांचे म्हणणे आहे.महायुतीतील घटक पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील संपर्क साधत आहेत. महायुतीतील सर्व पक्ष एकत्र येतील, असा दावा भाजपच्या नेत्यांकडून केला जात आहे.

जयंत पाटीलही आक्रमकराष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) नेते आमदार जयंत पाटील यांनीही मंगळवारी अजित पवार गटाच्या नेत्यांशी संवाद साधला आहे. राष्ट्रवादीचे नेते माजी खासदार संजय पाटील आणि माजी मंत्री अजितराव घोरपडे हे आघाडीसोबत जाण्यास राजी असल्याचे समजते. त्यांच्याशी याबाबत सकारात्मक चर्चा सुरू असल्याचे सांगण्यात आले. मात्र याबाबतचा अधिकृत निर्णय वरिष्ठ पातळीवर होईल, असेही सांगण्यात आले.

English
हिंदी सारांश
Web Title : Sangli Zilla Parishad: Talks Begin for Power, NCP Crucial

Web Summary : Sangli Zilla Parishad elections see coalition talks as no party secures a majority. Negotiations with NCP are key. BJP and Maha Vikas Aghadi vie for power, with all eyes on potential alliances to secure control.
टॅग्स :Zilla Parishad Electionजिल्हा परिषद निवडणूक निकाल २०२६SangliसांगलीNCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवारAjit Pawarअजित पवारJayant Patilजयंत पाटीलShiv Senaशिवसेना