शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
3
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
4
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
5
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
6
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
7
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
8
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
9
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
10
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
11
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
12
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
13
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
14
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
15
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
16
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
17
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
18
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
19
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
20
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
Daily Top 2Weekly Top 5

महापौरांना स्थायी समितीचा मोह सुटेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:29 IST

सांगली : महापालिकेच्या स्थायी समिती सदस्यपदाचा महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी राजीनामा दिला. त्यांच्या जागी नगरसेवक मगनू सरगर यांची नियुक्ती ...

सांगली : महापालिकेच्या स्थायी समिती सदस्यपदाचा महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी राजीनामा दिला. त्यांच्या जागी नगरसेवक मगनू सरगर यांची नियुक्ती झाली. पण, स्थायी सदस्यपदाचा मोह महापौरांना सुटलेला नाही. त्यांनी ३१ ऑगस्टपर्यंत सदस्यपदी असल्याचे सांगत सरगर यांना सभेची नोटीस कशी दिली, असा जाब नगरसचिव विभागाला विचारला. अखेर ज्येष्ठ सदस्यांनी हस्तक्षेप करीत हा वाद मिटविला.

महापालिकेच्या स्थायी समितीतील आठ सदस्यांची मुदत ३१ ऑगस्ट रोजी संपणार आहे. महापौर दिग्विजय सूर्यवंशी हेही स्थायी समितीचे सदस्य होते. गतवर्षी सप्टेंबरमध्ये त्यांची दोन वर्षासाठी निवड झाली. यंदा फेब्रुवारीत ते महापौर बनले. त्यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी त्यांना स्थायी समिती सदस्यपदाचा राजीनामा देण्यास सांगितले. त्यानुसार काही दिवसांपूर्वी त्यांनी राजीनामाही दिला. नुकत्याच झालेल्या महासभेत नवे आठ सदस्य व महापौरांच्या जागी एका सदस्याची निवड झाली. त्यांच्या जागी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ सदस्य मगनू सरगर यांना संधी देण्यात आली. नव्या आठ सदस्यांचा कार्यकाल ३१ ऑगस्टनंतर सुरू होणार आहे.

त्यात शुक्रवारी स्थायी समितीची सभा होत आहे. या सभेचा अजेंडा नगरसचिव कार्यालयाने सरगर यांना पाठविला. ही गोष्ट कळताच महापौरांनी नगरसचिवांना जाब विचारला. आपली मुदत ऑगस्ट अखेरपर्यंत आहे, असा त्यांचा दावा होता. ते स्थायी समितीतून निवृत्त झालेले नाही तर, राजीनामा दिला आहे, ही बाब नगरसचिवांसह ज्येष्ठ नगरसेवकांनी त्यांच्या निदर्शनास आणून दिली. राजीनामा दिल्यानंतर त्या दिवसापासून त्यांचे सदस्यपद रद्द होते. याची जाणीव झाल्यानंतर महापौरांनीही माघार घेतली.