शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
2
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
3
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
4
Top Marathi News LIVE Updates: खरातच्या पत्नीच्या नावे उरणमध्येही २० गुंठे जमीन
5
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
6
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
7
AC सोबत पंखा सुरू ठेवणं फायद्याचं की तोट्याचं? वीज बिल वाचवणारी 'ही' आहे खास ट्रिक
8
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
9
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
10
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
11
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
12
IPL 2026: MI vs CSK सामन्यात MS Dhoni खेळणार? चेन्नईच्या नेट प्रॅक्टिसमधून चित्र झालं स्पष्ट
13
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
14
इराणविरोधातील मोहिमेत मोसादचा महत्वाचा गुप्तहेर 'मेम' मारला गेला; इस्रायलने पहिल्यांदाच दिली कबुली
15
Palmistry: सावधान! तुमच्या राहु पर्वतावर 'क्रॉस' किंवा 'तीळ' तर नाही ना? हस्तशास्त्राचा मोठा इशारा
16
Ola Electric च्या शेअर्समध्ये ६५ टक्क्यांपर्यंत तेजी, अजून वाढ होणार का? काय आहे नवं टार्गेट?
17
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
18
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
19
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
Daily Top 2Weekly Top 5

महापौरांचा राजीनामा नव्या वर्षात!

By admin | Updated: December 24, 2014 00:24 IST

महासभेची प्रतीक्षा : इच्छुकांचे देव पाण्यात; उपमहापौरांचाही राजीनामा घेणार

सांगली : महापालिकेत पदाधिकारी बदलाचे वारे वाहू लागले आहे. विद्यमान महापौर कांचन कांबळे व उपमहापौर प्रशांत पाटील-मजलेकर या दोघांचा कार्यकाल पूर्ण झाल्याने त्यांना राजीनामा देण्याची सूचना करण्यात आल्याचा दावा इच्छुकांनी केला आहे. त्यासाठी नव्या वर्षाचा मुहूर्त शोधण्यात आला असून जानेवारीच्या पहिल्याच आठवड्यात या दोन्ही पदाधिकाऱ्यांचे राजीनामे होतील, असे सूत्रांनी सांगितले. दीड वर्षापूर्वी महापालिकेत विकास महाआघाडीच्या सत्तेला सुरूंग लावत काँग्रेसने एकहाती सत्ता घेतली होती. विधानसभा निवडणुकीचे गणित डोळ्यासमोर ठेवून सत्ताधारी गटाचे नेते माजी मंत्री मदन पाटील यांनी महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती ही तीनही महत्त्वाची पदे सांगलीकडेच ठेवली होती. विधानसभा निवडणुकीनंतर महापौर व उपमहापौर बदलण्याचे आश्वासनही दिले होते. त्यामुळे या पदासाठी इच्छुक असलेल्यांनी निवडणुकीपर्यंत कोणत्याच हालचाली केल्या नाही. विधानसभा निवडणुकीनंतर मात्र इच्छुकांच्या हालचाली गतिमान होण्यापूर्वीच मदन पाटील यांनी महापौर व उपमहापौरांच्या राजीनाम्याचा विषय नगरसेवकांच्या बैठकीत काढत त्यांना राजीनामा देण्याचे संकेत दिले. इतर नगरसेवकांना पदाबाबत शब्द दिला आहे, तो पाळावा लागेल, असेही त्यांनी सुनावले होते. त्यावेळी सर्वच नगरसेवकांनी याबाबतचा निर्णय घेण्याचे अधिकार मदन पाटील यांना दिले होते. काही दिवसांपूर्वीच मदन पाटील पालिकेत आले असता, पुन्हा एकदा त्यांनी इच्छुकांशी हितगुज केली. महापौर व उपमहापौरांनी डिसेंबरअखेरपर्यंतची मुदत मागितली असून नव्या वर्षात राजीनामा देण्याची तयारी दर्शविल्याचे इच्छुकांचे मत आहे. त्यामुळेच डिसेंबर महिन्याच्या वीस तारखेपर्यंत होणारी महासभाही सत्ताधारी गटाने घेतली नाही. दोन्ही पदाधिकारी महासभेत राजीनामा देणार आहेत. आता सत्ताधारी काँग्रेसने जानेवारीच्या पहिल्या आठवड्यातच महासभा घेण्याचे नियोजन केले असून त्यात दोन्ही पदाधिकारी राजीनामे देतील, असे सूत्रांनी सांगितले. (प्रतिनिधी)कांबळे, सातपुते इच्छुकसांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या महापौर पदासाठी मिरजेचे विवेक कांबळे यांचे नाव सर्वात आघाडीवर आहे. त्यात आता मिरजेतील बसवेश्वर सातपुते यांनी उडी घेतली आहे. सातपुते यांनी महापौर पदावर दावा केला आहे. उपमहापौर पदासाठी कुपवाडचे प्रशांत पाटील यांचे नाव आघाडीवर असून महिला सदस्यांना संधीची शक्यता वर्तविली जात आहे.