शहरं
Join us  
Trending Stories
1
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
2
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
3
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
4
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
5
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
6
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
7
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
8
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
9
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
10
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
11
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
12
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
13
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
14
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
15
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
16
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
17
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
18
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
19
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
20
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
Daily Top 2Weekly Top 5

गाळ्यांचे वर्षातून दोनदा मूल्यांकन

By admin | Updated: September 24, 2015 23:56 IST

जिल्हा परिषदेचा निर्णय : भाडे वसुलीकडे दुर्लक्ष

सांगली : विटा, तासगाव, मिरज येथे जिल्हा परिषदेच्या मालकीचे गाळे असून त्याकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळेच तेथील मालमत्ता व्यवस्थित राहत नसल्याची तक्रार सदस्यांनी केली. याची दखल घेऊन वर्षातून दोन वेळा जिल्हा परिषदेच्या मालकीचे गाळे व मालमत्तांचा अधिकाऱ्यांनी शोध घेण्याचा निर्णय जिल्हा परिषद बांधकाम समितीच्या बैठकीत घेण्यात आला. तसेच गाळेधारकांकडून भाडे वसुलीकडे दुर्लक्ष करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही बांधकाम समिती सभापतींनी दिला.सभापती गजानन कोठावळे यांच्या अध्यक्षतेखाली बांधकाम समितीची बैठक झाली. यावेळी सुरेश मोहिते यांनी, जिल्हा परिषदेच्या मालमत्तांकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष आहे, म्हणूनच विटा आणि तासगाव येथे अनधिकृत बांधकामे झाली आहेत. प्रत्येकवेळी कुणीही अनधिकृत बांधकामे करायची व पुन्हा त्यास मंजुरी द्यायची, हे चालणार नाही. यामध्ये प्रशासनाने ठोस भूमिका घेतली पाहिजे, अशी मागणी केली. त्यानुसार सभापती कोठावळे यांनी, गाळे आणि मालमत्तांचा शोध घेण्याची जबाबदारी उपअभियंत्यांवर टाकली आहे. मालमत्ता तपासून गाळेधारकांकडून भाडे वसुलीचा अहवाल अधिकारी सादर करतील, असे सांगितले. कोठावळे म्हणाले की, विटा, तासगाव येथील गाळेधारकांकडे पाच लाख ९६ हजार रुपयांची थकबाकी आहे. त्यापैकी एक लाख ५५ हजार रूपये वसूल झाले आहेत. विटा येथील दोन संस्थांच्या बांधकामाची चौकशी करून अधिकाऱ्यांना अहवाल देण्याची सूचना दिली आहे. जिल्ह्यातील रस्त्यांवरील दिशादर्शक फलक खराब झाले आहेत. म्हणून दोन हजार फलक तयार करण्यासाठी जिल्हा नियोजनकडे प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे.यावेळी सदस्य संजय सावंत, रणजित पाटील, छायाताई खरमाटे, कल्पना सावंत आदींसह अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)