शिराळा तालुक्यात बाजारपेठा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:28 IST2021-04-09T04:28:25+5:302021-04-09T04:28:25+5:30

फोटो -०८०४२०२१आयएसएलएम-शिराळा न्यूज १, २ : शिराळा येथील बाजारपेठेत शुकशुकाट लोकमत न्यूज नेटवर्क शिराळा : ‘ब्रेक दि चेन’अंतर्गत ...

Markets closed in Shirala taluka | शिराळा तालुक्यात बाजारपेठा बंद

शिराळा तालुक्यात बाजारपेठा बंद

फोटो -०८०४२०२१आयएसएलएम-शिराळा न्यूज १, २

: शिराळा येथील बाजारपेठेत शुकशुकाट

लोकमत न्यूज नेटवर्क

शिराळा : ‘ब्रेक दि चेन’अंतर्गत शिराळा तालुक्यात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद करण्यात आली आहेत. त्यामुळे व्यापारी वर्गात असंतोष निर्माण झाला आहे. नक्की आदेश काय व त्याची अंमलबजावणी कशी करायची, याचा अर्थ वेगवेगळ्या पद्धतीने घेतला जात आहे.

तालुक्यात अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच दुकाने बंद करण्यात आली आहेत. शासनाने ज्या व्यवसायांना परवानगी दिली, त्याच्याशी संलग्न व्यवसायांवर मात्र निर्बंध, यामुळे परवानगी असलेले व्यवसायही आपोआप बंद करावे लागले आहेत. बांधकाम साहित्य विक्री दुकाने बंद असल्याने या कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. गाडी घेऊन नागरिक खरेदीसाठी बाजारपेठेत येत असता अनेकांना मास्कबरोबर गाडीची कागदपत्रे, परवाना याबाबत विचारणा होत आहे.

लॉकडाऊन होणार म्हणून काही ठिकाणी मोठी गर्दी होत आहे, तर काही ठिकाणी बाजारपेठ ओस पडली आहे. अगोदरच महागाई, ग्राहक कमी यामुळे व्यापार अडचणीत आला आहे, त्यातच पुन्हा लॉकडाऊन त्यामुळे व्यापाऱ्यांत असंतोष निर्माण झाला आहे. तहसीलदार गणेश शिंदे, पोलीस निरीक्षक सुरेश चिल्लावर यांनी जनजागृतीसाठी बैठका आयोजित केल्या आहेत.

कोट

व्यापार एक दिवस बंद ठेवण्याचा आदेश आला तरीही नागरिक मोठ्या प्रमाणात खरेदीसाठी गर्दी करतात. २४ तास व्यापार सुरू ठेवण्यास परवानगी मिळाली तर शासनाच्या अटी व शर्ती पाळून व्यापार करू. शनिवार व रविवारी पूर्ण बंद ठेवल्यास व्यापारी पाठिंबा देतील.

- अमोल पारेख, अध्यक्ष, शिराळा तालुका व्यापारी महासंघ

Web Title: Markets closed in Shirala taluka