प्रसाद माळी, लोकमत न्यूज नेटवर्क, सांगली: एसटीने प्रवाशांसाठी अनेक सवलती लागू केल्या आहेत. त्या सवलतींसाठी एनसीएमसी कार्ड अनिवार्य केले आहे. या कार्डची नोंदणी व वितरणाची जबाबदारी ईवेक्स आणि एनएसडीएल पेमेंट बैंक या खासगी कंपनीला दिली आहे. या कार्डसाठी १९९ रुपये आकारले जातात. कार्ड काढण्यासाठी राज्यात ३ हजार एजंट नेमण्यात आले आहेत. एसटी स्टॅण्डवरील सेंटर व स्वतंत्र कॅम्पद्वारे हे एजंट प्रवाशांची नोंदणी करून कार्डचे वितरण करत आहेत. मात्र, जिल्ह्यातील एजंट या कार्डसाठी सर्रास २५० रुपये आकारात आहेत. काही एजंट ३०० ते ४०० रुपये फी वसूल करत आहेत. 'लोकमत'ने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमधून लुटीचा बाजार उजेडात आला आहे.
'लोकमत'च्या तालुका प्रतिनिधींनी तालुका स्तरावरील बस स्टॅण्डवर कार्यरत असणारे सेंटर व कॅम्पद्वारे कार्ड काढणाऱ्या एजंटकडून माहिती घेतली. अनेक सेंटरवर कार्ड काढण्याआधी १० रुपये किंवा २० रुपये घेऊन फॉर्म देतात व तो भरून घेऊन कार्डची नोंदणी केली जाते. यासह काही ठिकाणी २०० रुपये आकारून कार्डची नोंदणी केली जाते तसेच कार्ड देताना अॅक्टिव्हेशनचे ३० रुपये आकारले जात आहेत.
एजंटशी 'लोकमत' प्रतिनिधीचा संवाद
प्रतिनिधी: तुम्ही अधिकृत एजेंट आहात का?
एजंट: आम्हाला एनसीएसी कार्डसाठी अधिकृत एजंट म्हणून नेमले आहे. आम्ही एसटी स्टॅण्डवर सेंटर न चालवता, गावागावांत कॅम्प लावून नागरिकांना कार्ड काढून देतो.
प्रतिनिधी: कार्ड काढण्यासाठी किती चार्ज आकारता?
एजंट: मी ईश्वरपूरचा आहे. ग्रामपंचायत व सामाजिक संस्था काप आयोजित करतात. तिथे जाऊन आम्ही नोंदणी करतो व प्रत्येक व्यक्तीकडून २५० रुपये चार्ज आकारतो. प्रतिनिधी: कार्ड १९९ रुपयांना असताना तुम्ही अधिक आकारणी का करता? एजंट आम्ही गावोगावी जातो. जाण्याचा खर्च आम्हाला काढावा लागतो. नोंदणी करताना कार्डसाठी २०० रुपये घेतो. २० रुपये खर्चाचे व कार्ड आल्यानंतर अॅक्टिव्हेशनचे ३० रुपये असे २५० रुपये आकारतो.
प्रतिनिधी: अनेक एजंट वेगवेगळे दर आकारतात.
एजंट: गावांच्या अंतरावरून काही एजेंट ३०० ते ४०० रुपयेसुद्धा आकारतात. ज्यांना जसे परवडते तसेच ती आकारणी केली जाते. काही एजंट नोंदणी करताना २५० रुपये घेतात, तर कार्ड देताना अॅक्टिव्हेशनचे पुन्हा ३० ते ४० रुपये आकारतात. काही एजंट पोहोच पावतीही देत नाही. मात्र, आम्ही तसे करत नाही. आम्ही सुरुवातीलाच प्रवाशांना कल्पना देऊन २५० रुपये आकारणी करतो व त्यांना पोहोच पावतीही देतो. तसेच कार्ड देताना कार्डवर रिचार्ज करायचे आहे का याची विचारणा करून ५० किंवा १०० रुपयांचा रिचार्जही करून देतो.
ईबेक्स कंपनीच्या प्रतिनिधींचे म्हणणे
ईबेक्स कंपनौत्या प्रतिनिधींनी 'लोकमत'ला माहिती दिली की, एजंटकडून ३० हजार रुपये भरून घेऊन कार्ड रजिस्ट्रेशनसाठी त्यांना मशीन दिले जाते. कार्डसाठी १२९ रुपयेच आकारणी करायची आहे. कंपनीने सर्व एजंटना त्यापद्धतीने सूचना दिल्या आहेत. नोंदणीनंतर कार्डचे अॅक्टिव्हेशन झाल्यावर एजंटला त्यातील १० रुपये कमिशन दिले जाते. याव्यतिरिक्त कंपनी कोणतेही पैसे आकारत नाही व एजंटला आकारू देत नाही. कोणी एजंट असे जादाचे पैसे आकारत असेल आणि आमच्याकडे तक्रार आली तर आम्ही त्याचे काम थांबवतो.
मी दोन महिन्यांपूर्वी सांगली बस स्टॅण्डवरील सेंटरवर एनसीएमसी कार्डसाठी नोंदणी करण्यास गेले होते. तेव्हा माझ्याकडून २ रुपये घेऊन लेखी फॉर्म भरून घेतला. माझ्याकडे जुने कार्ड होते ते दाखवूनही माझ्याकडून २०० रुपये घेतले. दोन महिन्यांनी कार्ड आल्यावर अॅक्टिव्हेशनसाठी ३० रुपये घेतले गेले. असे २३० रुपये घेतले.
-पार्वती शंकर नाईक, अमृत ज्येष्ठ नागरिक लाभधारक प्रवासी, सांगली
सांगली स्टॅण्डवर एजंटकडून होतेय लूट
सांगली बस स्टॅण्डवरील सेंटर बार्शी येथील व्यक्तीने चालविण्यास घेतले आहे. त्याने २ रुपयांना छापील फॉर्मची विक्री केली. तसेच त्याचे फॉर्म शेजारच्या झेरॉक्स सेंटरमध्ये ५ ते ६ रुपयांना विक्रीस ठेवले आहे. २०० रुपये भरून कार्ड नोंदणी करून घेत असून, कार्ड वितरण करताना ऑक्टव्हेशनसाठी ३० रुपयांची आकारणी केली जाते. या लुटीसंदर्भात जाब विचारला असता त्याने उद्धट, उर्मट उत्तरे दिली. याउपर कहर म्हणजे ज्यांच्याकडे पूर्वीचे एसटीचे कार्ड आहे त्यांनी जुने कार्ड दाखविल्यावर ५० रुपये सूट दिली जाते. मात्र येथील सेंटरवर जुने कार्ड दाखवले तरी सूट न देता २०० रुपयांची आकारणी केली जाते.
Web Summary : Passengers are being overcharged for ST's NCMC cards in Sangli. Agents are charging ₹250-₹400 instead of ₹199. Activation fees are also added, despite company instructions. Complaints can lead to agent suspension.
Web Summary : सांगली में एसटी के एनसीएमसी कार्ड के लिए यात्रियों से अधिक शुल्क लिया जा रहा है। एजेंट ₹199 की जगह ₹250-₹400 वसूल रहे हैं। कंपनी के निर्देशों के बावजूद एक्टिवेशन शुल्क भी जोड़ा जा रहा है। शिकायतें एजेंट के निलंबन का कारण बन सकती हैं।