शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

द्राक्ष खरेदी करताना बाजार समितीच्या परवान्याची सक्ती

By admin | Updated: December 23, 2015 01:29 IST

शेखर गायकवाड : विक्री रोखीनेच करण्याचे आवाहन

सांगली : द्राक्षबागायतदारांची फसवणूक टाळण्यासाठी व्यापाऱ्यांनी द्राक्ष खरेदीपूर्वी बाजार समितीचा परवाना घेण्याची गरज आहे. जे व्यापारी दुर्लक्ष करतील, त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी मंगळवारी दिला. शेतकऱ्यांनी द्राक्षाची विक्री रोखीनेच करावी, असे आवाहनही त्यांनी केले.जिल्हाधिकारी कार्यालयात द्राक्ष उत्पादकांच्या फसवणुकीच्या प्रश्नावर बैठक झाली. यावेळी जिल्हाधिकारी गायकवाड बोलत होते. जिल्हा पोलीसप्रमुख सुनील फुलारी, जिल्हा पुरवठा अधिकारी भाऊसाहेब गलांडे, मिरजेचे प्रांताधिकारी सुभाष बोरकर, जिल्हा उपनिबंधक प्रकाश अष्टेकर, सांगली बाजार समितीचे सभापती संतोष पाटील, उपसभापती जीवन पाटील, सचिव प्रकाश पाटील, तासगाव बाजार समितीचे सभापती अविनाश पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रवक्ते महेश खराडे, तासगावचे तहसीलदार सुधाकर भोसले उपस्थित होते.गायकवाड म्हणाले की, सध्या द्राक्षाचा हंगाम सुरु झाला असून, शेतकऱ्यांची परप्रांतीय व्यापाऱ्यांकडून फसवणूक होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी रोखीनेच विक्री करावी. व्यापाऱ्यांनी जिल्ह्यात द्राक्ष खरेदी करण्यापूर्वी संबंधित भागातील बाजार समितीकडून परवाना घेण्याची गरज आहे. शेतकऱ्यांनी परवानाधारक खरेदीदारांकडेच द्राक्षाची विक्री करावी. विक्रीनंतर संबंधित व्यापाऱ्यांकडून माल दिल्याची पोहोच तीन प्रतीत घ्यावी. यामध्ये वाहन क्रमांक, वाहन मालकांचे नाव, खरेदीदार, दलालाचे नाव आदींचा समावेश असावा. (प्रतिनिधी)करातून सूटद्राक्षबागायतदारांची लूट थांबविण्यासाठी सर्व व्यवहार बाजार समितीमध्ये करावेत. शेतकऱ्यांनी द्राक्षे आणल्यानंतर त्यास बाजार समिती कोणताही कर लावणार नाही. व्यापाऱ्यांनाही बाजार समितीमार्फत मूलभूत सुविधा देण्यात येतील. व्यापाऱ्यांनी बाजार समितीमधूनच खरेदीचे व्यवहार करावेत, असे आवाहन बाजार समितीने केले आहे.