शहरं
Join us  
Trending Stories
1
आईच्या नावाने मुलाला ओळखणार, कागदपत्रांवर मातेचे नाव लागणार! सर्व शाळांमध्ये एकच नियम लागू
2
Watermelon Death Case Mumbai : कलिंगडामुळे मृत्यू नाही! FDA अहवालाने संभ्रम मिटला; मुंबईतील 'त्या' ४ जणांच्या मृत्यूचे गूढ कायम
3
बरगी धरणात देवदूत धावले! स्वतःचा जीव धोक्यात घालून कामगारांनी वाचवले डझनभर प्राण; मुख्यमंत्र्यांनी बक्षीस केले जाहीर
4
IPL 2026 Playoffs Race: पुढचं पुढं बघू, आधी CSK चा बदला घेऊ! याच इराद्याने चेपॉकच्या मैदानात उतरेल MI
5
Post Office Scheme : सोन्यासारखी आहे पोस्ट ऑफिसची 'ही' स्कीम; ₹१ लाख जमा करा, मिळेल ₹४५,००० चं व्याज
6
युद्धामुळे तेलाच्या दराचा भडका! सर्वाधिक फटका भारताला, पेट्रोल-डिझेलच्या किमतींचा ‘टाइम बॉम्ब’
7
‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
8
बोट बुडू लागली तेव्हा आतमध्ये काय घडलं? लाईफ जॅकेट कुठे होते? दुर्घटनेच्या व्हिडीओत दिसलं असं काही
9
साडेतीन वर्षांच्या बालिकेचा लैंगिक अत्याचार करून खून; नराधमास ताब्यात द्या, ग्रामस्थ संतप्त, महामार्ग दोन तास रोखला
10
कमर्शियल LPG दरवाढीचा हॉटेल उद्योगाला जोरदार फटका; खाद्यपदार्थांचे दर १५ टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता
11
भारतीय उद्योगांना चीनचा विळखा; इलेक्ट्रॉनिक, रसायने, औषध क्षेत्र संकटात येण्याची भीती
12
"इराणला अण्वस्त्रे देऊ नका, ते क्षणातच विध्वंस घडवतील", ट्रम्प यांनी 'नाटो'ला केलं सावध!
13
ईव्हीएममध्ये फेरफार केल्याच्या आरोप; बंगालमधील १५ मतदान केंद्रांवर फेरमतदान सुरू
14
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
15
ट्रम्प चिडले, पण फेमस झाल्या जॉर्जिया मेलोनी! तरुणाई तर त्यांच्यामागे खंबीरपणे उभी राहिली
16
मुंबईत ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’, १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; ३४९ किलो कोकेनही हस्तगत
17
IPL 2026 : वैभव-यशस्वी सुपरहिट जोडीचा फ्लॉप शो! तरी RR निर्धास्त; KL राहुलच्या खेळीने DC ला दिलासा
18
महामुंबईत सायकल ट्रॅकचा ‘ट्रॅक’च हरवला!, सायकल आहे, पण चालवायची कुठे?; कोट्यवधींचा खर्च वाया
19
पेट्रोल-डिझेल दरवाढ उंबरठ्यावर?; व्यावसायिक गॅस सिलिंडरही महागले, निवडणुका आटोपताच तगडा झटका
Daily Top 2Weekly Top 5

नगरसेवकांचे मराठी प्रेम बेगडी

By admin | Updated: November 18, 2014 01:00 IST

बेळगाव महापालिका : नामांतराबाबत चिडिचूप; सीमाप्रश्नाचा ठरावही मांडला नाही

बेळगाव : बेळगाव महापालिकेत मराठी भाषिकांची सत्ता असतानादेखील महानगरपालिका बैठकीत मराठी भाषिक नगरसेवकांनी सीमाप्रश्नाचा ठराव तर मांडला नाहीच, शिवाय बेळगावच्या नामांतराबाबत एकही शब्द उच्चारला नाही. त्यामुळे बैठकीत पुन्हा एकदा मराठी नगरसेवकांचे बेगडी प्रेम समोर आले आहे. बेळगाव महापालिकेच्या पहिल्या बैठकीत सीमाप्रश्नाचा ठराव न मांडल्याने आणि कर्नाटक सरकार कारवाई करील या भीतीने १ नोव्हेंबर या काळ्यादिनाच्या सायकलफेरीत मराठी नगरसेवक सामील झाले नव्हते. यामुळे महापौर महेश नाईक, उपमहापौर रेणू मुतगेकर यांच्या विरोधात मराठी जनतेने रोष व्यक्त केला होता. महापौरांच्या घरावर मोर्चा काढला होता. काही नगरसेवकांना बैठकीत बोलावून ठराव न मांडल्याबद्दल जाबही विचारला होता, पण मराठी भाषिक नगरसेवक सभागृहात गप्प राहिले. मात्र, बेळगाव शहराचे नामांतर बेळगावी असे केल्याने या नामांतराला मराठी नगरसेवकांकडून महापालिकेत विरोध अपेक्षित होता, मात्र सर्वसाधारण बैठकीत बेळगावी नामांतराविरोधात ‘ब्र’सुद्धा न काढल्याने मराठी भाषिकांत संताप व्यक्त करण्यात येत आहे. बेळगाव महापालिकेत एकूण ५८ पैकी ३२ नगरसेवक मराठी भाषिक असून, महापौर-उपमहापौर आणि महत्त्वाची पदे मराठी भाषिक नगरसेवकांकडे आहेत. मात्र महापालिकेच्या कार्यालयावर ‘बेळगावी’ असा फलक लिहिला आहे आणि तरीही मराठी नगरसेवक गप्प का आहेत, असा सवाल जनतेतून विचारला जात आहे. बैठकीत पाणीपट्टी वाढविण्यासंबंधी प्रस्ताव मांडण्यात आला. या ठरावाला सर्वच नगरसेवकांनी विरोध केला. शहराच्या पाणीपुरवठ्यासंबंधी अभ्यास करण्यासाठी समिती नेमून या समितीने पुढील बैठकीत आपला अहवाल सादर करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. महापौर, उपमहापौर आणि नगरसेवकांचे मानधन वाढविण्याचा प्रस्ताव त्वरित मंजूर करण्यात आला. महापौरांना वीस हजार, उपमहापौरांना पंधरा हजार आणि नगरसेवकांना दहा हजार मानधन देण्याचा ठराव एकमताने मंजूर झाला. बैठकीत विरोधी गटनेते रमेश सोंटक्की यांनी विकासकामे होत नसल्याचा आरोप केला. यावेळी सत्ताधारी गटनेते किरण सायनाक आणि रमेश सोंटक्की यांच्यात शाब्दिक चकमक झडली. आयुक्त रवीकुमार यांनी शहरात विकासकामे सुरू असल्याचे सांगितले. तसेच चोवीस तास पाणीपुरवठा करण्यासाठी ७६० कोटींच्या निविदेची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती सभागृहाला दिली. बेळगावच्या नामांतराविषयी महापौर महेश नाईक यांनी गुळमुळीत प्रतिक्रिया नोंदविली. मराठीत बेळगाव, कन्नडमध्ये बेळगावी आणि इंग्रजीमध्ये बेलगाम असेच आहे. सीमाप्रश्न सध्या सर्वोच्च न्यायालयात असल्यामुळे आम्ही त्यावर लक्ष केंद्रित केल्याचे महेश नाईक यांनी सांगितले. (प्रतिनिधी)