शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा
3
धक्कादायक! कोरोनावरील या लसीमुळे होऊ शकतात साईड इफेक्ट्स, कंपनीने स्वत:च दिली कबुली    
4
कार्यकर्तेच ठरविणार विजयाचा गुलाल...! शाहू छत्रपती आणि मंडलिक लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष
5
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
6
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
7
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
8
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
9
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
10
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
11
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
12
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
13
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
14
१८% ‘कलंकित’; २९% कोट्यधीश; तिसऱ्या टप्प्यातील १,३५२ उमेदवारांकडे आहे ५.७७ कोटींची सरासरी संपत्ती
15
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
16
राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन
17
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
18
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
19
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत

मुलींच्या अपहरणप्रकरणी सावत्र आईला सक्तमजुरी बांबवडे-शिराळा येथील घटना : आरोपी महिला लातूरची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 05, 2018 11:43 PM

इस्लामपूर : बांबवडे (ता. शिराळा) येथून तीन अल्पवयीन मुलींचे अपहरण करून त्यांना अमानवी कृत्यासाठी विकण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिलेस येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाच्या पहिले जिल्हा न्यायाधीश श्रीमती के. एस. होरे यांनी

इस्लामपूर : बांबवडे (ता. शिराळा) येथून तीन अल्पवयीन मुलींचे अपहरण करून त्यांना अमानवी कृत्यासाठी विकण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिलेस येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाच्या पहिले जिल्हा न्यायाधीश श्रीमती के. एस. होरे यांनी दोषी धरत तिला पाच वर्षे सश्रम कारावास आणि ६ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.शिक्षा झालेली ही महिला आरोपी लातूर जिल्ह्यातील टाकळी बुद्रुक येथील राहणारी आहे. विद्या रघुनाथ गायकवाड (वय ३६) असे तिचे नाव आहे. या आरोपी महिलेने ८ ते ९ जणांबरोबर लग्न करून संसारही थाटला होता. अल्पवयीन मुलींना पळवून नेण्यापूर्वी तिने बांबवडे (ता. शिराळा) येथील मानसिंग हिंदुराव धुमाळ यांच्याशी संसार केला. न्यायालयाने तिला कलम ३६३, ३६६ आणी ३६६ (अ) नुसार प्रत्येकी पाच वर्षे सश्रम कारावास व दंडाची शिक्षा सुनावली. दंड न दिल्यास तिला आणखी ३ महिने सश्रम कारावास भोगावा लागणार आहे.या खटल्याची पार्श्वभूमी अशी, आरोपी विद्या रघुनाथ गायकवाड हिने अनेक नवºयांना गंडा घातल्यानंतर मानसिंग धुमाळ यांच्याशी लग्न केले. त्यांना पहिल्या पत्नीपासून १६, १४ आणि ११ वर्षे वयाच्या तीन मुली होत्या. विद्या ही या मुलींना सावत्र आई लागत होती. या मुली अल्पवयीन आहेत, हे माहीत असतानाही ती मुलींना ‘तुमचे चांगल्या ठिकाणी लग्न लावून देते’ असे म्हणून फूस लावत होती. ५ एप्रिल २०१७ रोजी विद्या बांबवडे येथील राहत्या घरातून या तीन मुलींना पळवून घेऊन गेली.त्यानंतर मुलींचे वडील मानसिंग धुमाळ यांनी तिच्याविरुद्ध शिराळा पोलिसांत फिर्याद दिली. विद्या ही या मुलींना घेऊन पोलिसांना चकवा देत तब्बल पावणेदोन महिने फरारी राहिली होती. यादरम्यान या मुलींना हातकणंगले येथील धनगर गल्लीत भाड्याने खोली घेऊन ठेवले होते. तेथे वेगवेगळ्या ग्राहकांना आणून त्या मुलींना दाखवत होती. त्याचवेळी पोलिसांनी तिला २७ मे रोजी अटक केली होती. या खटल्यात सरकार पक्षाला हवालदार टी. ए. पवार, चंद्रकांत शितोळे यांनी मदत केली.दहा साक्षीदार तपासलेअतिरिक्त जिल्हा सरकारी वकील रणजित पाटील यांनी सरकार पक्षातर्फे १० साक्षीदार तपासले. त्यामध्ये आरोपी विद्याच्या दोन पूर्व नवºयांनीही साक्ष दिली. फिर्यादी मानसिंग धुमाळ, १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी, साक्षीदार यांच्यासह तपास अधिकारी पी. एन. गायखे आणि पोलीस उपअधीक्षक किशोर काळे यांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या. रणजित पाटील यांनी आपल्या युक्तिवादात आरोपी विद्या गायकवाडचे कृत्य हे पूर्वनियोजित आणि हेतूत: केले गेले आहे. तिने अनेकांशी लग्न केले आहे. तिच्यावर कोणीही अवलंबून नाही. त्यामुळे तिच्या हातून पुन्हा असा गुन्हा घडू नये यासाठी जास्तीत जास्त शिक्षा द्यावी, अशी मागणी केली.

टॅग्स :Sangeeta Thombareसंगीता ठोंबरेlaturलातूरCrimeगुन्हा