शहरं
Join us  
Trending Stories
1
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
2
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
3
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
4
“कोकण ही साक्षात देवभूमी, महाराष्ट्राच्या विकासाचा कणा”; सुनेत्रा पवारांचे कौतुकास्पद उद्गार
5
केदारनाथवरुन परतताना ट्रेनमधून कुठे गायब झाली 'ती'? स्वत:च सांगितली ६ दिवसांची मिसिंग मिस्ट्री
6
'आरोपी पळून जाण्याची शक्यता नाही'; ३ वर्षांच्या मुलीवरील अत्याचार प्रकरणात कोर्टाकडून केअरटेकरला जामीन
7
Marathi News LIVE: डोंबिवली रेल्वे स्थानकाच्या फलाटावर विद्युत जनित्राचा स्फोट, सेवा अनिश्चित काळासाठी बंद
8
"जनतेला त्यागाचा उपदेश करण्यापेक्षा PM मोदींनीच राष्ट्रहितासाठी..."; काँग्रेसचा खोचक टोला
9
अंगावर पेट्रोल ओतलं, हात-पाय बांधले अन्... पोलिसांना अडकवण्यासाठी महिला यूट्यूबरने रचला अपहरणाचा 'ड्रामा'
10
"मी खूप घाबरले होते...", दिशा परदेशीने संजय दत्तसोबत काम करतानाचा सांगितला अनुभव
11
PM Narendra Modi: एक वर्ष सोनं खरेदी करू नका, हे आवाहन कशासाठी? त्यात देशाचा काय फायदा? सोप्या शब्दांत समजून घ्या 'अर्थ'कारण
12
Photos: खूपच सुंदर दिसते निशिगंधा वाड यांची लेक ईश्वरी; पाहा तिचे ग्लॅमरस फोटो
13
Astro Tip: वाईट स्वप्नांपासून हवीये मुक्ती? रोज रात्री झोपण्यापूर्वी आवर्जून ऐका 'हे' प्रभावी स्तोत्र!
14
IPS TanuShree : खाकी वर्दीचं स्वप्न! लग्न, बाळ, घराची जबाबदारी सांभाळत 'ती' झाली IPS; आव्हानांवर केली मात
15
Travel : कोकणचा किनारा अन् शांतता अथांग... गोवाही विसरायला लावतील महाराष्ट्रातील 'हे' ५ सुपरहिट बीचेस
16
Solo Trip: ऑफिस आणि घरापलीकडचं जग! स्त्रियांनी आयुष्यात एकदा तरी 'एकट्याने' का फिरावं?
17
Mithilesh Tiwari: बिहारच्या शिक्षणमंत्र्यांचे मुलींबद्दल हे कसले विचार? व्हिडीओ झाला व्हायरल, लोक संतापले!
18
“जगाने निर्बंध लादायचे प्रयत्न केले, पण भारत कुणापुढे झुकला नाही”; पोखरणवर PM मोदी थेट बोलले
19
Travel : जगाचा निरोप घेण्यापूर्वी 'या' १५ पर्यटन स्थळांचा अनुभव नक्की घ्या; आयुष्य सार्थकी लागेल!
Daily Top 2Weekly Top 5

Sangli Crime: महावितरण कर्मचाऱ्याचा संखमध्ये गोळ्या झाडून खून, दोघांना अटक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2026 12:20 IST

सुपारी देऊन खून केल्याची शक्यता

उमदी : संख (ता. जत) येथे व्हरांड्यात झोपलेल्या संतोष शिवाप्पा बिरादार (वय ४२) या महावितरणच्या कर्मचाऱ्याचा छातीत गोळ्या झाडून निर्घृण खून करण्यात आल्याची घटना शनिवारी मध्यरात्रीनंतर घडली.

खुनानंतर उमदी पोलिसांनी अवघ्या तीन तासांत छडा लावत महांतेश मल्लया स्वामी (३५, रा. दरीबडची, ता. जत), रोहित ऊर्फ नागेश बाळू जगदाळे (२२, रा. शंभर फुटी रस्ता, त्रिमूर्ती कॉलनी, सांगली) या दोघांना अटक केली. खुनाच्या नेमक्या कारणाबाबत तपास सुरू आहे. याप्रकरणी मृत बिरादार यांची मुलगी श्रवंती संतोष बिरादार (१६) हिने उमदी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. १० मे रोजी रात्री १२:३० ते १ वाजण्याच्या सुमारास संतोष बिरादार हे कुटुंबासह घराच्या व्हरांड्यात झोपले होते. त्यावेळी आरोपींनी पिस्तुलातून त्यांच्या छातीत दोन गोळ्या झाडल्या. भारनियमन सुरू असल्यामुळे परिसरात अंधार असल्याचा फायदा घेत आरोपी घटनास्थळावरून शेताच्या दिशेने पसार झाले. गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या बिरादार यांचा जागीच मृत्यू झाला.

खुनाची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन थोरबोले यांच्या मार्गदर्शनाखाली उमदी पोलिसांनी तातडीने तपास करत अवघ्या तीन तासांत दोघा हल्लेखोरांची माहिती मिळविली. आरोपी रोहित ऊर्फ नागेश बाळू जगदाळे हा संख-दरीबडची रस्त्यावर असल्याचे समजताच पोलिस उपनिरीक्षक बंडू साळवे, सिद्धेश्वर गायकवाड यांच्या पथकाने तेथे जाऊन त्याला ताब्यात घेतले.

चौकशीत त्याने महांतेश मल्लय्या स्वामी याच्यासह खून केल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी जाडरबोबलाद-माडग्याळ मार्गालगतच्या शेतातून महांतेश स्वामी यालाही ताब्यात घेतले. दोन्ही आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र, खुनाचे नेमके कारण काय? याबाबत गावात उलटसुलट चर्चा रंगली होती.

या कारवाईत पोलिस उपनिरीक्षक दिनेश घसाडे, पो.हे.कॉ संतोष माने, लक्ष्मण बंडगर, कावेरी मोटे, महादेव मडसनाळ, संजय पांढरे, परशराम देशमुखे, छाया बाबर, रेणुका कुंभरे, सोपान भंडे, सुदर्शन खोत आदींचा सहभाग होता. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक संदीप कांबळे करत आहेत.

अंधाराचा फायदा घेत थेट छातीत गोळ्या

संख परिसरात सुरू असलेल्या भारनियमनामुळे घटनेवेळी परिसरात अंधार होता. याच संधीचा फायदा घेत आरोपींनी संतोष बिरादार यांच्या छातीत जवळून गोळ्या झाडल्या. कोणताही सीसीटीव्ही अथवा प्रत्यक्ष पुरावा नसतानाही उमदी पोलिसांनी अवघ्या तीन तासांत आरोपींना अटक केली.

सुपारी देऊन खून केल्याची शक्यता

संशयित रोहित जगदाळे हा सांगलीतील रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याने सुपारी घेऊन साथीदाराच्या मदतीने खून केल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली. त्यानुसार पोलिस तपास सुरू आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Maharashtra Electricity Worker Shot Dead in Sangli, Two Arrested

Web Summary : A Maharashtra electricity worker, Santosh Biradar, was fatally shot in Sangli. Police swiftly arrested two suspects, Mahantesh Swami and Rohit Jagdale, within three hours. The motive remains under investigation, with a possible contract killing angle being explored.