शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : जतमध्ये फडणवीसांच्या शिलेदाराने गड खेचून आणला; गोपीचंद पडळकरांचा मोठा विजय

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2024 16:01 IST

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : जत विधानसभा मतदारसंघात आमदार गोपीचंद पडळकर यांनी विजय मिळवला आहे.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results ( Marathi News ) : विधानसभा निवडणुकांचे निकाल समोर आले आहेत. सांगली जिल्ह्यातील जत विधानसभा मतदारसंघात मोठा बदल झाला आहे. भाजपाच्यागोपीचंद पडळकर यांनी विजय खेचून आणला आहे. गोपीचंद पडळकर यांना १०९७६४ एवढी मत मिळाली आहेत. तर विक्रम सावंत यांना ७२६६१ एवढी मत मिळाली आहे. पडळकर यांनी ३७१०३ एवढे मताधिक्य घेत विजय खेचून आणला आहे. 

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : शिराळा विधानसभा मतदारसंघात सत्यजित देशमुखांचा विजय; मानसिंगराव नाईकांना किती मत मिळाली?

जत विधानसभा मतदारसंघावर मागील निवडणुकीत काँग्रेसच्या विक्रम सावंत यांनी विजय मिळवला होता. तर या निवडणुकीत भाजपाच्या गापीचंद पडळकर यांनी विजय मिळवला आहे. यामुळे आता पुन्हा एकदा जत विधानसभा मतदारसंघ भाजपाकडे गेला आहे. 

शिराळा विधानसभा मतदारसंघात सत्यजित देशमुखांचा विजय

शिराळा विधानसभा मतदारसंघात सत्यजीत देशमुख यांनी १३०७३८ एवढी मत घेतली आहेत. तर राष्ट्रवादीच्या मानसिंगराव नाईक यांनी १०८०४९ एवढी मत घेतली आहे. सत्यजीत देशमुख यांनी २२, ६८९ मतांची आघाडी घेऊन विजय खेचून आणला आहे. 

इस्लामपूरमध्ये महायुती की मविआ जिंकले

इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याविरोधात अजित पवार यांनी मोठी मोर्चेबांधणी करत निशिकांत पाटील यांना उमेदवारी दिली.  मतमोजणीमध्ये सुरुवातीपासूनच दोन्ही नेते हजार मतांनी आघाडी पिछाडीवर होते. सुरुवातील जयंत पाटील यांनी आघाडी घेतली होती, यानंतर निशिकांत पाटील यांनी आघाडी घेतली. या मतदारसंघात मोठी चुरस निर्माण झाली होती. अखेर शेवटच्याक्षणी जयंत पाटील यांनी मोठी आघाडी घेत १३,५०० मतांनी विजय मिळवला आहे.

इस्लामपूर विधानसभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठी मोर्चेबांधणी केली होती. भाजपातील निशिकांत पाटील यांना उमेदवारी देऊन दोन मोठ्या प्रचारसभा घेतल्या होत्या. तर दुसरीकडे जयंत पाटील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रचारसभांसाठी महाराष्ट्राचा दौरा सुरू केला होता. मतदारसंघात पाटील यांचा प्रचार त्यांच्या कार्यकर्त्यांनी केला होता, जयंत पाटील यांच्यावर ऊसाच्या मुद्द्यावरुन टीका केल्या होत्या.  या मदरासंघात ऊस दराचा मुद्दा मोठ्या प्रमाणात गाजला होता. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024BJPभाजपाmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Shiv SenaशिवसेनाGopichand Padalkarगोपीचंद पडळकर