आजच्या धावपळीच्या आयुष्यात आपण अनेकदा उशिरा जेवतो आणि लगेच झोपी जातो. कधी कामाच्या व्यापामुळे, तर कधी मोबाईल किंवा टीव्ही बघताना वेळेचे भान राहत नाही. पण तुम्हाला माहिती आहे का, की रात्रीच्या जेवणाची वेळ तुमची झोप, पचन आणि संपूर्ण आरोग्यावर किती परिणाम करते? आयुर्वेद असो वा डॉक्टर्स, दोन्हीही या गोष्टीवर भर देतात की जेवण आणि झोप यामध्ये ठराविक वेळेचं अंतर असणं अत्यंत आवश्यक आहे. योग्य वेळी जेवल्यामुळे केवळ अन्न नीट पचत नाही, तर झोपही गाढ आणि शांत लागते.
झोपण्यापूर्वी किती वेळ आधी जेवावं?
आयुर्वेद आणि डॉक्टरांच्या मते, पचनसंस्था उत्तम राखण्यासाठी आणि चांगल्या झोपेसाठी झोपण्यापूर्वी किमान २ ते ३ तास आधी रात्रीचे जेवण केले पाहिजे. एवढा वेळ मिळाल्याने अन्न नीट पचतं आणि एसिडिटी, गॅस किंवा छातीत जळजळ होण्यासारख्या समस्यांचा धोका कमी होतो. ज्यांना 'GERD' किंवा वारंवार 'एसिड रिफ्लक्स'चा त्रास होतो, त्यांनी हे अंतर ३ तास किंवा त्यापेक्षा जास्त ठेवणं अधिक फायदेशीर ठरतं. उदाहरणार्थ, जर तुम्ही रात्री १० वाजता झोपत असाल, तर ७ ते ८ वाजेपर्यंत जेवण उरकले पाहिजे आणि जर ११ वाजता झोपत असाल, तर ८ वाजेपर्यंत जेवणं उत्तम आहे, जेणेकरून झोपताना पोट हलक राहील आणि गाढ झोप लागेल.
जेवण आणि झोप यामध्ये अंतर का असावं?
पचन क्रिया सुधारते
जेवल्यानंतर शरीराला अन्न पचवण्यासाठी वेळ हवा असतो. जर आपण जेवल्याबरोबर लगेच आडवे झालो, तर पचन प्रक्रिया नीट होत नाही.
एसिडिटी आणि छातीत जळजळ
जेवल्यानंतर लगेच झोपल्याने पोटातील एसिड अन्ननलिकेत वरच्या दिशेला येऊ शकतं, ज्यामुळे एसिड रिफ्लक्स, छातीत जळजळ आणि आंबट ढेकर येण्यासारख्या समस्या उद्भवू शकतात.
शांत आणि गाढ झोप
झोपेच्या दरम्यान शरीर स्वतःची दुरुस्ती करत असते, मेंदूला आराम देते आणि हार्मोन्सचे संतुलन राखते. जर पोट जड असेल किंवा पचन प्रक्रिया सुरू असेल, तर झोप वारंवार मोडते.
वजन आणि मेटाबॉलिज्म
रात्री उशिरा जेवल्यामुळे मेटाबॉलिझ्म मंदावतं, शरीरात फॅट साठू लागते आणि वजन वाढण्याचा धोका निर्माण होतो.
रात्री काय खावं आणि काय टाळावं?
रात्री हलकं आणि सहज पचणारं अन्न घ्यावं. उदा. उकडलेल्या किंवा कमी शिजवलेल्या भाज्या, डाळ, खिचडी, थोड्या प्रमाणात पोळी किंवा भात, हळद घातलेले कोमट दूध, थोडे बदाम किंवा अक्रोड आणि कमी प्रमाणात साधे दही खा.
रात्री अतिशय जड, तळलेले आणि जास्त मसालेदार पदार्थ खाणं टाळावें. तसेच जास्त गोड पदार्थ, कॅफिन (चहा, कॉफी) आणि रात्री उशिरा फळं (विशेषतः जास्त गोड) खाणं टाळावं.
Web Summary : For good digestion and sleep, maintain a 2-3 hour gap between dinner and bedtime. Avoid acidity by eating light, easily digestible foods. Late-night meals disrupt metabolism and sleep quality. Prioritize timely, healthy eating habits for overall well-being.
Web Summary : अच्छे पाचन और नींद के लिए रात के खाने और सोने के बीच 2-3 घंटे का अंतर रखें। एसिडिटी से बचने के लिए हल्का भोजन करें। देर रात का भोजन मेटाबॉलिज्म और नींद को बाधित करता है। बेहतर स्वास्थ्य के लिए समय पर भोजन करें।