LPG Gas Crisis: सांगलीत तीन एजन्सीवर गुन्हे दाखल; ७१ हजाराचा मुद्देमाल जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2026 14:04 IST2026-03-14T14:03:40+5:302026-03-14T14:04:18+5:30

जिल्ह्यात ३७ गॅस एजन्सी, ३१ हॉटेल्सची तपासणी

LPG Gas Crisis Cases registered against three agencies in Sangli, Goods worth Rs 71 thousand seized | LPG Gas Crisis: सांगलीत तीन एजन्सीवर गुन्हे दाखल; ७१ हजाराचा मुद्देमाल जप्त

LPG Gas Crisis: सांगलीत तीन एजन्सीवर गुन्हे दाखल; ७१ हजाराचा मुद्देमाल जप्त

सांगली : युध्दाच्या तणावपूर्ण पार्श्वभूमीवर जिल्ह्यात एलपीजी सिलिंडर वितरण, इंधन पुरवठा सुरळीत ठेवण्याकामी जिल्हा प्रशासनामार्फत गॅस एजन्सींची काटेकोर तपासणी करण्यात येत आहे. दक्षता व फिरत्या पथकांमार्फत ३७ गॅस एजन्सींची तसेच ३१ हॉटेल्सची तपासणी करण्यात आली. या तपासणीमध्ये एकूण ७१ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून ३ एजन्सीवर गुन्हे दाखल केले आहेत. ३ जणांना अटक करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी सांगितले.

जिल्ह्यातील इंधन पुरवठ्याच्या अनुषंगाने आढावा घेऊन जिल्हाधिकारी काकडे म्हणाले, सांगली जिल्ह्यात सध्या एलपीजीचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. त्यानुसार एचपीसीएल कंपनीचा ३,६६२ मेट्रिक टन, बीपीसीएल कंपनीचा १,०३९ मेट्रिक टन व आयओसीएल कंपनीचा ५७ मेट्रिक टन इतका एलपीजी साठा उपलब्ध आहे. त्यामुळे जिल्ह्यातील घरगुती ग्राहकांना गॅस सिलिंडरचा पुरवठा सुरळीतपणे सुरू राहणार आहे. ऑनलाइन बुकिंग केलेल्या सर्व ग्राहकांना उपलब्धतेनुसार क्रमाने सिलिंडरचा पुरवठा करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

घरगुती एलपीजी गॅसचे सुरळीत वितरण व्हावे तसेच घरगुती गॅसचा अवैध वापर रोखण्यासाठी जिल्हास्तरावर दक्षता व फिरते पथक नियुक्त करण्यात आले आहे. गॅस एजन्सीकडून सिलिंडरचा गैरमार्गाने पुरवठा केल्याचे आढळल्यास अथवा घरगुती एलपीजीचा वापर व्यावसायिक कारणासाठी होत असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे.

Web Title : सांगली: एलपीजी गैस संकट में गिरफ्तारियां, एजेंसियों पर जब्ती

Web Summary : युद्ध तनाव के बीच, सांगली प्रशासन ने गैस एजेंसियों का निरीक्षण किया, ₹71,200 का माल जब्त किया और अनियमितताओं के लिए तीन को गिरफ्तार किया। पर्याप्त एलपीजी स्टॉक से घरों में निर्बाध आपूर्ति सुनिश्चित की गई है, दुरुपयोग पर सख्त कार्रवाई की जाएगी।

Web Title : Sangli: LPG Gas Crisis Leads to Arrests, Seizures at Agencies

Web Summary : Amidst war tensions, Sangli authorities inspected gas agencies, seizing ₹71,200 worth of goods and arresting three for irregularities. Ample LPG stock ensures uninterrupted supply to households, with strict action against misuse.