शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: बाळूमामा मंदिरात जिवंत नागाची पूजा, नागासह पुजारी ताब्यात

By संतोष भिसे | Updated: February 29, 2024 15:25 IST

शिराळा : ढवळी (ता. वाळवा) येथील बाळूमामा मंदिरात जिवंत नागाची पूजा करून नाग सोडण्यासाठी जाताना पुजारी जितेंद्र ऊर्फ विशाल ...

शिराळा : ढवळी (ता. वाळवा) येथील बाळूमामा मंदिरात जिवंत नागाची पूजा करून नाग सोडण्यासाठी जाताना पुजारी जितेंद्र ऊर्फ विशाल बबन पाटील (वय ३४) यास वन विभागाने नागासह ताब्यात घेतले. इस्लामपूर न्यायालयाच्या परवानगीनंतर नागास नैसर्गिक अधिवासात सोडून पुजाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.याबाबत वन विभागाकडून मिळालेली माहिती अशी : सोमवारी (दि. २६) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास बाळूमामा मंदिरात जिवंत नागाची पूजा केली जात आहे, अशी माहिती वन विभागास मिळाली. त्यानंतर वन कर्मचारी मंदिरात पोहोचले असता तेथे तसे काही आढळले नाही. मात्र पुजारी जितेंद्र पाटील नागाला घेऊन बाहेर पडल्याचे समजले. कर्मचाऱ्यांनी पाठलाग करून जितेंद्र पाटील यास ढवळी ते भडकंबे रस्त्यावर जिवंत नागासह ताब्यात घेतले. बुधवारी इस्लामपूर न्यायालयात उभे केले असता न्यायालयाने नागास नैसर्गिक अधिवासात सोडण्यास परवानगी दिली. सहायक वन संरक्षक डॉ. अजित साजणे यांनी जितेंद्र पाटील याच्यावर गुन्हा दाखल केला. पुढील चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.ही कारवाई उपवनसंरक्षक नीता कट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक वनसंरक्षक डॉ. अजित साजणे, मानद वन्यजीव रक्षक अजितकुमार पाटील, वन क्षेत्रपाल एकनाथ पारधी, वन रक्षक भिवा कोळेकर, वनपाल डी. बी. बर्गे, प्राणीमित्र ओंकार पाटील, निवास उगळे, विक्रम टिबे, विजय पाटणे, शंकर रकटे, आदींनी केली.दरम्यान, अंधश्रद्धेचे कृत्य करणाऱ्या जितेंद्र पाटील यांच्यावर जादूटोणाविरोधी कायद्यानुसार कारवाई करावी अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने आष्टा पोलिसात निवेदनाद्वारे केली.निवेदनात म्हटले आहे, जितेंद्र पाटील हा ''बाळूमामांनी स्वप्नात येऊन दृष्टांत दिला आहे'' अशी खोटी बतावणी करून बुवाबाजी करत आहे. लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी दर गुरुवारी, रविवारी, अमावास्या, पौर्णिमाला घरात दरबार भरवत आहे. करणी काढणे, भानामती करणे, भूतबाधा काढणे, मूल होण्यासाठी दैवी उपाय सांगणे, देवाला कौल लावणे हे अंधश्रद्धेचे प्रकार करत आहे. यातून लोकांची आर्थिक आणि मानसिक पिळवणूक करत आहे. तसे निनावी पत्र आम्हाला आले आहे.

अंनिसच्या राज्याध्यक्ष सरोजमाई एन. डी. पाटील यांच्या गावीच हा प्रकार सुरू असल्यामुळे अतिशय गंभीर आहे. महाराष्ट्रात जादूटोणाविरोधी कायदा लागू आहे. या कायद्यानुसार वरील सर्व प्रकार दखलपात्र गुन्ह्यास पात्र आहेत. पोलिसांनी चौकशी करून हे अंधश्रद्धेचे प्रकार बंद करावेत. निवेदनावर राहुल थोरात, शंकर माने, डॉ. संजय निटवे, आशा धनाले, शशिकांत बामणे आदींच्या सह्या आहेत.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस