शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
2
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
3
हरभजन सिंगविरोधात समर्थकांचा रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
4
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
5
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
6
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
7
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
8
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
9
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
10
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
11
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
12
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
13
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
14
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
15
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
16
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
17
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
18
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
19
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
20
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
Daily Top 2Weekly Top 5

वस्त्रोद्योगातील अडचणींवर उपाययोजना करू

By admin | Updated: September 17, 2015 23:43 IST

चंद्रकांतदादा पाटील : सागरेश्वर सूतगिरणीस भेट

कडेगाव : राज्यातील सहकारी सूतगिरण्यांच्या अडचणींबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून या उद्योगाच्या वाढीसाठी व संवर्धनासाठी ठोस उपाययोजना करणार आहे, अशी ग्वाही सहकार, पणन व वस्त्रोद्योगमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. पाटील यांनी कडेगाव येथील सागरेश्वर सहकारी सूतगिरणीला सदिच्छा भेट दिली. त्यावेळी माजी मंत्री आमदार पतंगराव कदम, वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी, जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिलीपतात्या पाटील, सागरेश्वर सूतगिरणीचे अध्यक्ष शांताराम कदम, ज्येष्ठ नेते मोहनराव कदम, महेंद्र लाड यांनी सूतगिरण्यांच्या अडचणींबाबत वस्त्रोद्योग मंत्र्यांशी चर्चा केली.यावेळी वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी म्हणाले की, महाराष्ट्रातील वाढते विजेचे दर, जगातील बाजारपेठेच्या तुलनेत महाराष्ट्रातील वाढत चाललेला कापूस दर, चुकीच्या आयात-निर्यात धोरणाने सुताची थांबलेली निर्यात, देशात वाढलेला सुताचा दर यामुळे सहकारी सूतगिरण्या अडचणीत आल्या आहेत. दिलीपतात्या पाटील यांनी, या व्यवसायासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली. यावेळी सागरेश्वर सूतगिरणीचे कार्यकारी संचालक ए. बी. चालुक्य उपस्थित होते. सूतगिरण्यांच्या प्रश्नावर उपाययोजना झाल्या पाहिजेत. वस्त्रोद्योगमंत्री चंद्रकांतदादांनी मनावर घेतल्यास सूतगिरण्यांचे सर्व प्रश्न मार्गी लागतील, असे मत पतंगराव कदम यांनी व्यक्त केले. (वार्ताहर)