शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
4
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
5
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
6
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
7
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
8
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
9
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
10
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
11
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
12
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
13
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
14
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
15
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
16
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
17
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
18
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
19
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
20
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
Daily Top 2Weekly Top 5

एलबीटीचा निर्णय चुकलाच

By admin | Updated: October 2, 2014 22:28 IST

जयंत पाटील : सांगलीतील सभेत जाहीर कबुली

सांगली : घाईगडबडीने जकात रद्द करून एलबीटी व्यापाऱ्यांवर लादण्याचा आघाडी सरकारचा निर्णय चुकलाच आहे. एलबीटीचा प्रश्न अर्धवट ठेवून व्यापारी, महापालिका कर्मचारी आणि नागरिकांचीही राज्य सरकारने फरफटच केली आहे. या प्रश्नाबद्दल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत वारंवार आपण भांडत होतो. परंतु, त्याकडे आमच्या सहकाऱ्यांनी गांभीर्याने पाहिले नाही, अशी टीका माजी ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांनी करून, आघाडी सरकारला घरचा आहेर दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने हरिपूर येथे आयोजित सभेत जयंत पाटील बोलत होते. ते म्हणाले की, जकात रद्द केल्यामुळे महापालिका कर्मचाऱ्यांचे पगार होत नाहीत. अनेक महापालिकांची आर्थिक कोंडी झाली आहे. जकात रद्दचे व्यापाऱ्यांनी स्वागत केले. पण, एलबीटी कराच्या जाचामध्ये त्यांची होरपळ होत आहे. एलबीटीचा प्रश्न कायमस्वरूपी निकालात काढण्याचा प्रत्येक मंत्रिमंडळाच्या बैठकीत मी आग्रह धरला होता. परंतु, याकडे आमच्याच सहकाऱ्यांनी गांभीर्याने लक्ष दिले नाही. सध्या मंत्रीपदाचा राजीनामा दिल्यामुळे मंत्रिमंडळ बैठकीतील चुकीच्या निर्णयावर भाष्य करू शकतो. म्हणूनच एलबीटीच्या प्रश्नाबाबत आघाडी सरकारचा निर्णय चुकला आहे, असे माझे मत आहे, असे पाटील म्हणाले. राष्ट्रवादी पक्ष ग्रामीण भागात तळागाळापर्यंत पोहोचला आहे. पण, भाजप आणि शिवसेनेला ग्रामीण भागात जनाधार नाही, असेही ते म्हणाले. यावेळी सुरेश पाटील, दिग्विजय सूर्यवंशी, पद्माकर जगदाळे, श्रीनिवास पाटील, यांची भाषणे झाली. संजय बजाज, अभिजित हारगे उपस्थित होते. (प्रतिनिधी)संस्था चालविण्यास अंगात धमक लागतेज्यांना स्वत:च्या संस्था व्यवस्थित चालवता आल्या नाहीत, ते दुसऱ्यांवर आरोप करीत सुटले आहेत. आपण कसे पराभूत झालो, याची कारणे शोधून ती दुरुस्त करण्याऐवजी माझ्यावरच पराभवाचे खापर फोडत आहेत. संस्था चालविण्यासाठीही अंगात धमक लागते, अशी टीका त्यांनी प्रतीक पाटील यांच्यांवर केली.लोकसभेला नरेंद्र मोदींची गरज होती म्हणून जनतेने त्यांना मतदान केले. परंतु, राज्यात मोदी उमेदवार नसल्याने त्यांच्या नावाचा काहीही फायदा होणार नाही. जनमत चाचण्यांचे अंदाजही चुकणार आहेत. भ्रष्टाचारविषयी जाहिराती प्रसिध्द करण्यासाठी कोट्यवधी रूपये भाजपकडे कुठून आले?, असा सवालही केला.