कुपवाड तलाठी कार्यालयाची अप्पर तहसीलदारांकडून झाडाझडती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:25 IST2021-02-05T07:25:45+5:302021-02-05T07:25:45+5:30

कुपवाड : तलाठी आणि कोतवालांचा मनमानी कारभार, वाढती एजंटगिरी, प्रलंबित कामे, सर्वसामान्यांचे होणारे हाल या कारणांमुळे वादग्रस्त बनलेल्या ...

Kupwad Talathi office cleared by Upper Tehsildar | कुपवाड तलाठी कार्यालयाची अप्पर तहसीलदारांकडून झाडाझडती

कुपवाड तलाठी कार्यालयाची अप्पर तहसीलदारांकडून झाडाझडती

कुपवाड : तलाठी आणि कोतवालांचा मनमानी कारभार, वाढती एजंटगिरी, प्रलंबित कामे, सर्वसामान्यांचे होणारे हाल या कारणांमुळे वादग्रस्त बनलेल्या कुपवाड तलाठी कार्यालयाची सोमवारी

अप्पर तहसीलदार डॉ. अर्चना पाटील यांनी झाडाझडती घेतली. यावेळी त्यांनी कुपवाडसाठी स्वतंत्र दोन तलाठ्यांची नेमणूक करून १५ दिवसांत प्रश्नांचा निपटारा करण्याचे अभिवचन नागरिकांना दिले.

कुपवाड तलाठी कार्यालयाविरोधात असंख्य तक्रारी वाढल्या आहेत. तलाठी आणि कोतवालांचा मनमानी कारभार, वाढती एजंटगिरी, प्रलंबित कामे, सर्वसामान्यांचे होणारे हाल या कारणांमुळे हे कार्यालय वादग्रस्त बनले होते. ‘लोकमत’ने याप्रकरणी वारंवार आवाज उठवला होता. जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांच्याकडेही निवेदनाद्वारे तक्रारी दाखल झाल्या होत्या. याची दखल घेऊन सोमवारी अप्पर तहसीलदार डॉ. अर्चना पाटील व नायब तहसीलदार उमेश कोळी यांनी कुपवाड तलाठी कार्यालयास अचानक भेट दिली.

यावेळी तहसीलदारांनी तलाठी व कोतवालांना समोर घेऊन कार्यालयाची झाडाझडती घेतली. कामात सुधारणा करण्याच्या कडक शब्दात सूचना दिल्या. यावेळी तलाठी कार्यालयासमोर गर्दी केलेल्या नागरिकांच्या समस्या ऐकून घेऊन विस्तारित कुपवाडसाठी स्वतंत्र दोन तलाठ्यांची नेमणूक करून येत्या १५ दिवसांत नागरिकांच्या प्रश्नांचा निपटारा करू, असे नागरिकांना आश्वासन दिले.

Web Title: Kupwad Talathi office cleared by Upper Tehsildar