शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
4
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
5
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
6
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
7
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
8
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
9
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
10
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
11
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
12
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
13
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
14
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
15
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
16
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
17
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
18
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
19
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
20
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षक समितीकडून कोविड सेंटर सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:34 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : प्राथमिक शिक्षक समितीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शाहू, फुले सहकारी रुग्णालयाच्या माध्यमातून सांगलीत न्यू लाईफ ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : प्राथमिक शिक्षक समितीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शाहू, फुले सहकारी रुग्णालयाच्या माध्यमातून सांगलीत न्यू लाईफ कोविड सेंटर सुरू करण्यात आले. या कोविड सेंटरचे उद्घाटन गुरुवारी करण्यात आले. जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढल्याने हे सेंटर सुरू केल्याचे शिक्षक समितीने सांगितले. जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांना बेडसाठी धावपळ करावी लागत आहे. सामाजिक बांधीलकीतून महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती पुरस्कृत न्यू लाईफ सेंटर, राममंदिर चौकातील घोडके हाॅस्पिटलमध्ये सुरू करण्यात आले. त्याचे उद्घाटन राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजय बजाज, काँग्रेसचे युवा नेते जितेश कदम, प्राथमिक शिक्षणाधिकारी विष्णू कांबळे, उपशिक्षणाधिकारी महेश धोत्रे, अनिरुद्ध उपासना केंद्राचे प्रमुख रवींद्र बेंडखळे, माजी उपमहापौर प्रशांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.

यावेळी शिक्षणाधिकारी विष्णू कांबळे म्हणाले, शिक्षक समिती या संघटनेच्या माध्यमातून चालविले जाणारे हे देशातील एकमेव सेंटर आहे. हा समाजोपयोगी उपक्रम स्तुत्य आहे. रुग्णांना चांगली सेवा द्यावी.

यावेळी शिक्षक समितीचे नेते विश्वनाथ मिरजकर, किरण गायकवाड, संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र कांबळे, उपाध्यक्ष अजित पाटील, राज्य संघटक सयाजी पाटील, जिल्हाध्यक्ष बाबासाहेब लाड, पार्लमेंटरी बोर्डाचे सचिव शशिकांत भागवत, खासगी महासंघाचे जिल्हाध्यक्ष अरविंद गावडे, शिक्षक समितीचे जिल्हा उपाध्यक्ष सहदेव बागी, शिक्षक बँकेचे संचालक तुकाराम गायकवाड, शशिकांत बजबळे, श्रेणिक चौगुले, संजय रोकडे, डी. डी. पाटील, संजय हजारे, डॉ. विक्रम कोळेकर, डॉ. पृथ्वीराज पाटील उपस्थित होते.