सांगली : शहरातील सटाले मळा परिसरात मित्राच्या बहिणीविषयी वाईट बोलल्याच्या कारणावरून एका तरुणावर चाकूने जीवघेणा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात ऋषिकेश सखाराम इमकर (वय २१, रा. सटाले मळा) हा गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गुरुवारी रात्री उशिरा ही घटना घडली. याप्रकरणी संजयनगर पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ऋषिकेश इमकर हा पेंटिंगचे काम करतो. संशयिताच्या मित्राच्या बहिणीविषयी त्याने अपशब्द वापरल्याचा संशयिताच्या मनात राग होता. याच कारणावरून दोघांमध्ये वाद झाला. हा वाद टोकाला गेल्यानंतर संशयिताने चाकूने हल्ला केला. वर्मी वार झाल्याने ऋषिकेश रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. हल्ल्यानंतर संशयित घटनास्थळावरून फरार झाला.
स्थानिक नागरिकांनी जखमी ऋषिकेशला तातडीने रुग्णालयात दाखल केले. त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून, त्याची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. दरम्यान, संजयनगर गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने तातडीने हालचाली करत संशयिताला ताब्यात घेतले आहे. पोलिसांकडून त्याची सखोल चौकशी सुरू असून, घटनास्थळी पंचनामा करण्यात आला. संजयनगर परिसरात आठवडाभरात घडलेली ही दुसरी गंभीर घटना असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
Web Summary : In Sangli, a youth was stabbed for allegedly insulting a friend's sister. Rishikesh Imkar is critically injured. Police have arrested the suspect and are investigating the incident which occurred in Satale Mala area.
Web Summary : सांगली में एक युवक पर दोस्त की बहन के बारे में अपमानजनक टिप्पणी करने के आरोप में चाकू से हमला किया गया। ऋषिकेश इमकर गंभीर रूप से घायल हैं। पुलिस ने संदिग्ध को गिरफ्तार कर लिया है और सतले माला इलाके में हुई घटना की जांच कर रही है।