शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
2
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
3
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
4
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
5
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
6
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
7
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
8
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
9
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
10
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
11
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
12
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
13
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
14
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
15
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
16
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
17
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
18
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
19
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
20
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
Daily Top 2Weekly Top 5

खरिपाच्या उत्पादनाचा पाऊस झाला वैरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2015 22:47 IST

शेतकरी हवालदिल : तासगावात कृषी विभागाचा शून्य टक्के उत्पादनाचा नजरअंदाज अहवाल; पिके करपली

दत्ता पाटील - तासगाव तालुक्यात खरिपाचा पेरा झालेले ४० हजार १२८ हेक्टर क्षेत्र पावसाअभावी वाया गेल्याचे चित्र आहे. तालुक्यातील बहुतांश पिके करपून चालली आहेत. याबाबत तालुका कृषी विभागाने केलेल्या नजरअंदाज पाहणीत यंदाच्या खरीप पिकांची शून्य टक्के उत्पादकता निश्चित केली असून, याबाबतचा अहवाल जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आला आहे. ऐन गरजेच्या काळात पावसाने हुलकावणी दिल्यामुळे शेतकरी हवालदिल आहेत. मान्सूनच्या सुरुवातीला पाऊस आलाच नसता, तर खरिपाच्या खर्चाचा बोजा तरी राहिला नसता, अशी खंत व्यक्त करीत, पाऊस वैरी झाल्याची भावनाही शेतकरी व्यक्त करत आहेत.तासगाव तालुक्यात मान्सूनच्या सुरुवातीला पावसाचे दमदार आगमन झाले. त्यामुळे शेतकऱ्यांनी धांदल करून खरिपाची पेरणी उरकून घेतली. तालुक्यात खरिपाचे एकूण सरासरी क्षेत्र ४६ हजार ८५ हेक्टर इतके आहे. त्यापैकी ४० हजार १२८ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झालेली आहे. सर्वाधिक ज्वारी पिकाची २२ हजार ४०० हेक्टरवर पेरणी झाली आहे. सोयाबीनची ६ हजार ७३८ हेक्टरवर, बाजरी ४०० हेक्टर, मका ४ हजार २५० हेक्टर, तर भुईमुगाची २ हजार ३४५ हेक्टरवर पेरणी झालेली आहे.खरिपाचा पेरा झाल्यानंतर सातत्याने पावसाने हुलकावणी दिली. आज ना उद्या पाऊस येईल, या आशेवर तालुक्यातील शेतकरी नजर लावून बसला होता. मात्र पेरणी केलेले पीक करपून चालल्यामुळे शेतकऱ्यांची उरलीसुरली आशा संपुष्टात आलेली आहे. पिकापासून उत्पादन राहिले, किमान चारा उपलब्ध होईल, याचीही आता शाश्वती राहिलेली नाही. त्यामुळे खरिपासाठी केलेला खर्च आणि वाया गेलेले पीक, याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला असून, शेतकरी हवालदिल झाल्याचे चित्र दिसून येत आहे.खरिपाच्या उत्पादनाचा पाऊस झाला वैरीशेतकरी हवालदिल : तासगावात कृषी विभागाचा शून्य टक्के उत्पादनाचा नजरअंदाज अहवाल; पिके करपली दत्ता पाटील ल्ल तासगावतासगाव तालुक्यात खरिपाचा पेरा झालेले ४० हजार १२८ हेक्टर क्षेत्र पावसाअभावी वाया गेल्याचे चित्र आहे. तालुक्यातील बहुतांश पिके करपून चालली आहेत. याबाबत तालुका कृषी विभागाने केलेल्या नजरअंदाज पाहणीत यंदाच्या खरीप पिकांची शून्य टक्के उत्पादकता निश्चित केली असून, याबाबतचा अहवाल जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आला आहे. ऐन गरजेच्या काळात पावसाने हुलकावणी दिल्यामुळे शेतकरी हवालदिल आहेत. मान्सूनच्या सुरुवातीला पाऊस आलाच नसता, तर खरिपाच्या खर्चाचा बोजा तरी राहिला नसता, अशी खंत व्यक्त करीत, पाऊस वैरी झाल्याची भावनाही शेतकरी व्यक्त करत आहेत.तासगाव तालुक्यात मान्सूनच्या सुरुवातीला पावसाचे दमदार आगमन झाले. त्यामुळे शेतकऱ्यांनी धांदल करून खरिपाची पेरणी उरकून घेतली. तालुक्यात खरिपाचे एकूण सरासरी क्षेत्र ४६ हजार ८५ हेक्टर इतके आहे. त्यापैकी ४० हजार १२८ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झालेली आहे. सर्वाधिक ज्वारी पिकाची २२ हजार ४०० हेक्टरवर पेरणी झाली आहे. सोयाबीनची ६ हजार ७३८ हेक्टरवर, बाजरी ४०० हेक्टर, मका ४ हजार २५० हेक्टर, तर भुईमुगाची २ हजार ३४५ हेक्टरवर पेरणी झालेली आहे.खरिपाचा पेरा झाल्यानंतर सातत्याने पावसाने हुलकावणी दिली. आज ना उद्या पाऊस येईल, या आशेवर तालुक्यातील शेतकरी नजर लावून बसला होता. मात्र पेरणी केलेले पीक करपून चालल्यामुळे शेतकऱ्यांची उरलीसुरली आशा संपुष्टात आलेली आहे. पिकापासून उत्पादन राहिले, किमान चारा उपलब्ध होईल, याचीही आता शाश्वती राहिलेली नाही. त्यामुळे खरिपासाठी केलेला खर्च आणि वाया गेलेले पीक, याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला असून, शेतकरी हवालदिल झाल्याचे चित्र दिसून येत आहे.कडधान्याचा पालापाचोळा; चाराटंचाईतालुक्यात तूर, उडीद, मुगासह इतर कडधान्यांची तीन हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे. कमी काळात कडधान्यांचे उत्पादन घेता येत होते; मात्र पावसाअभावी बहुतांश कडधान्यांचा पालापाचोळाच झाल्याचे चित्र तालुक्यात सर्वच ठिकाणी दिसून येत आहे.तालुक्यात सर्वाधिक ज्वारी पिकाची २२ हजार ४०० हेक्टरवर, तर मका पिकाचीही चार हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे. मात्र ही पिके करपून गेल्यामुळे यावर्षी चारा उपलब्ध होणार कसा? असा प्रश्न आतापासूनच शेतकऱ्यांसमोर उभा असून, पावसाअभावी चाराटंचाई भेडसावणार आहे.तालुका कृषी विभागामार्फत पिकांची सद्यस्थिती पाहून शून्य टक्के उत्पादनाचा नजरअंदाज अहवाल सादर केला आहे. सप्टेंबर महिन्यात पीक कापणी अहवाल तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी कृषी विभागामार्फत १६, पंचायत समितीमार्फत १५, तर महसूल विभागामार्फत ३१ अशा एकूण ६२ प्लॉटस्मध्ये पीक कापणी करून, अहवाल सादर करण्यात येणार आहे.