शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
3
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
4
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
5
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
6
हायप्रेशर स्टील ट्यूब फुटली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; ७०० डिग्री वाफेने वेढलं अन् १७ जणांचा कोळसा झाला
7
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
8
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
9
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
10
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
11
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
12
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
14
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
15
Video - इन्स्टा रीलमुळे वाचला जीव; बोट दुर्घटनेवेळी मृत्यूशी झुंज, महिलेने सांगितला थरारक प्रसंग
16
Travel: ओमानमध्ये भारताचे १० हजार रूपये घेऊन जाताय; इतक्या पैशात काय काय खरेदी करू शकाल?
17
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
19
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
20
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
Daily Top 2Weekly Top 5

कासेगाव, परिसरातील ठेवीदारांचे धाबे दणाणले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : कासेगाव (ता. वाळवा) येथील नेहमी शुकशुकाट असलेल्या यशवंतराव मोहिते पतसंस्थेच्या शाखेत वर्दळ वाढली आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

इस्लामपूर : कासेगाव (ता. वाळवा) येथील नेहमी शुकशुकाट असलेल्या यशवंतराव मोहिते पतसंस्थेच्या शाखेत वर्दळ वाढली आहे. तसेच वाळवे तालुक्यातील सर्वच शाखांमध्ये ठेवीदारांनी धाव घेतली आहे. सध्या या ठिकाणी फक्त शिपाई कार्यरत असल्याने ठेवीला कोण जबाबदार? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. दरम्यान, रेठरे हरणाक्ष दाैऱ्यावर असताना डॉ. इंद्रजित मोहिते यांची गाडी अडवून ठेवीदारांनी त्यांना ठेवींच्या रकमेबद्दल जाब विचारला.

कासेगाव येथील संतोष पाटील यांच्यासह चार जणांनी यशवंतराव मोहिते पतसंस्थेत अंदाजे २० लाख रुपयांच्या ठेवी ठेवल्या होत्या. गेले दीड वर्षापासून या ठेवी परत मिळाव्यात यासाठी रेठरे बु. येथे असलेल्या मुख्य कार्यालयात ते खेटे घालत आहेत. संस्थापक डॉ. इंद्रजित मोहिते यांना निवेदन देण्याचा प्रयत्न केला. शाखेमध्ये शिपायाव्यतिरिक्त एकही अधिकारी-कर्मचारी भेटत नाही. अशीच अवस्था वाळवे तालुक्यातील सर्व शाखांमध्ये आहे. दरम्यान, शनिवार, दि. १० रोजी कासेगाव (ता. वाळवा) येथील पतसंस्थेच्या शाखेत २५ हून अधिक ठेवीदारांनी धाव घेतली. तेथे फक्त शिपाई होता, अशी माहिती मिळते. कासेगाव परिसरातील नागरिकांच्या दोन ते अडीच कोटींच्या ठेवी अडकल्याने या ठेवीदारांचे धाबे दणाणले आहेत.

दरम्यान, कृष्णेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डॉ. इंद्रजित मोहिते हे रेठरे हरणाक्ष येथे गेले होते. यावेळी येथील ठेवीदारांनी त्यांची गाडी अडवून आपल्या गुंतवलेल्या रकमेबद्दल जाब विचारला. या गावातील शाखेत अंदाजे दीड कोटीच्या ठेवी असल्याचे सांगण्यात येत आहे. या ठेवीबद्दल मोहिते यांनी तुमच्या स्थानिक संचालकांनी घेतलेले कर्ज भरले नाही. तुम्ही त्यांच्याकडे जा आणि जाब विचारा, असे सांगत ठेवीची जबाबदारी निश्चितपणे आपण घेऊ, असे आश्वासन दिले.

चौकट

डॉ. इंद्रजित मोहिते यांनी ‘लोकमत’ला सांगितले की गेले पंधरा वर्षे मी संचालक बोर्डात नाही. वडिलांच्या नावाने संस्था आहे म्हणूनच याची जबाबदारी घेत आहे. कृष्णा साखर कारखान्याचे सर्व व्यवहार या संस्थेच्या माध्यमातून चालत होते. त्यावेळी संस्था भक्कम होती. कर्जाची हमी कारखाना घेत होता. आता सत्ताधारी संचालकांनी हात झटकले आहेत. त्यामुळेच ही स्थिती निर्माण झाली आहे.

फोटो : ११ इस्लामपुर १..२..३

ओळी : रेठरे हरणाक्ष (ता वाळवा) येथील ठेवीदारांनी डॉ इंद्रजित मोहिते यांनी गाडी अडवली. त्यांनी बेनेटवर बसून उत्तरे दिली.