शहरं
Join us  
Trending Stories
1
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
2
'कोलकाता पॅटर्न'ने मुंबईतील कंपन्यांना लुटले; फ्रेट व्यवसायाच्या नावाखाली कोट्यवधीचा गैरव्यवहार
3
इराण युद्ध आणि ८५% इथेनॉलचा धोरणात्मक धक्का; आता 'इलेक्ट्रिक' गाडी घेणे ठरणार का शहाणपणाचे?
4
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
5
बाबा वेंगाची सोन्याबाबत मोठी भविष्यवाणी; पाहा आता दरांबाबत काय म्हटलंय? खरं झालं तर...
6
भाजपाचे उमेदवार शुभेंदू सरकार यांना मारहाण; पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात कुठे काय घडले...
7
"तुमच्यापाशी दुसरा तुल्यबल विचारच नाही..."; कॉम्रेड गोविंद पानसरेंच्या सूनेने संजय गायकवाडांना सुनावले
8
मुंबईतून दुपारी सुटणाऱ्या ‘वंदे भारत’ ट्रेनचे टाइमटेबल बदलले, नवीन वेळ काय? कधी होणार लागू?
9
‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकावरून वाद पेटला; आमदार-प्रकाशक संघर्षातून राज्यात नवे राजकीय वादळ
10
'भुजिया किंग' शिवरतन अग्रवाल यांचे निधन; शुन्यातून उभारले हजारो कोटींचे साम्राज्य...
11
Petrol-Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीच्या चर्चांना पूर्णविराम; केंद्र सरकारचा मोठा खुलासा
12
Gondia Crime: 'तुला जिवे मारीन' म्हणत हात-पाय बांधून शाळेत डांबले; लग्नासाठी अल्पवयीन मुलीचे अपहरण
13
२०२६ मध्ये उन्हाचा कहर! AC-कूलरही होतील फेल? बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
14
आता खासगी शाळांमध्येही फक्त NCERT पुस्तके, महागड्या पुस्तकावर बंदी; NHRC ने राज्यांना दिला ३० दिवसांचा वेळ
15
IPL 2026: MI vs CSK मॅचआधी चेन्नईला मोठा धक्का; खेळाडूच्या आईचे निधन, सामन्याला मुकणार!
16
Trinamool Congress vs BJP: तृणमूल अन् भाजप यांच्यात थेट लढत; ‘तिसरी आघाडी’मुळे कोणाचा स्वप्नभंग
17
“ते इथे येतात, मुले जन्माला घालतात अन्...”; ट्रम्प यांच्याकडून भारताची थेट नरकाशी तुलना?
18
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
19
तामिळनाडूमध्ये ५.७३ कोटी मतदार ठरवणार ४,०२३ उमेदवारांचे भवितव्य, 'या' जागांवर सर्वांची नजर
20
PM Internship Scheme 2026: आता १८ ते २५ वर्षांच्या तरुणांना मिळणार ₹९००० चं स्टायपेंड; नियमांमध्ये झाला मोठा बदल
Daily Top 2Weekly Top 5

अपहाराचा मुद्दा गाजणार

By admin | Updated: September 23, 2015 00:07 IST

जिल्हा बँकेची आज सभा : २३ विस्तारित कक्षांचा निर्णय शक्य

सांगली : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कर्मचाऱ्यांनी गेल्या पंधरा वर्षात जवळपास दीड कोटी रुपयांची अफरातफर केली असून बँकेच्या मंगळवारी, २३ सप्टेंबर रोजी होणाऱ्या सभेत याप्रकरणी जोरदार चर्चा होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर बड्या तीस थकबाकीदारांवरील कारवाईचा मुद्दाही कळीचा बनणार असल्याचे संकेत मिळत आहेत. जिल्हा बँकेची वार्षिक सभा २३ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजता होणार आहे. सभेच्या विषयपत्रिकेवर अनेक महत्त्वाचे विषय आहेत. यामध्ये शाखानिहाय झालेल्या अफरातफरीची आकडेवारी, तसेच नव्या विस्तारित कक्षांचा विषय महत्त्वाचा आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेत संचालक मंडळ अस्तित्वात आल्यानंतरची ही पहिलीच वार्षिक सभा होत आहे. त्यामुळे या सभेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गेल्या काही दिवसांपासून बँकेच्या संचालक मंडळाने अनेक निर्णय घेतलेले आहेत. कर्जवाटपाबरोबरच थकित कर्जांच्या वसुलीसाठी पावले उचलली जात आहेत. प्रत्यक्षात अद्याप वसुलीसाठी ठोस कोणतीही कारवाई झालेली नाही. त्यामुळे हा विषय चर्चेला येऊ शकतो. सध्याचा हा ज्वलंत विषय आहे. सहकार आयुक्त व सहकारी संस्था निबंधकांनी १ जानेवारी २0१३ रोजी काढलेल्या एका परिपत्रकानुसार नवीन शाखा, विस्तारित कक्ष सुरू करण्यासाठी प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. त्यानुसार २३ नवे विस्तारित कक्ष सुरू करण्यात येणार आहेत. व्यवसाय वाढीच्यादृष्टीने संबंधित आर्थिक वर्षात व्यवसाय करावयाच्या नवीन ठिकाणी विस्तारित कक्षांचा तपशील वार्षिक सभेत द्यायचा असतो. त्यानुसार बँकेने २0१६-२0१७ चा व्यवसाय वृद्धिंगत आराखडा तयार केला असून त्यामध्ये एप्रिल २0१६ व ३१ मार्च २0१७ अखेर बँकेची संभाव्य आर्थिक स्थिती कशी राहील, याविषयीचा तपशील देण्यात आला आहे. (प्रतिनिधी)पंधरा वर्षांतील शाखानिहाय अपहार...शाखा अपहार दिनांक अपहार रक्कम वसूल थकितनेलकरंजी२२/२/२00११३,५३,११८८,३२,३१८५,२0,८00जुनेखेड२१/२/२00६३५00३५00———अंत्री बुद्रुक्र१६/१0/२00६५५0५५0———वाळवा २२/२/२00७३,७४,४00३,७४,४00———उमदी १६/१/२00९४,७६,000४,७६,000———ऐतवडे खुर्द१४/५/२00९२२,९२,000———२२,९२,000विश्रामबाग२२/२/२00९३,१२,000३,१२,000———पेड३0/९/२00९१0,000१0,000———कर्नाळ ३/६/२0१0२२,00,000२२,00,000———माडग्याळ १४/६/२0१0१,१0,000१,१0,000———आमणापूर२८/११/२0१३२0,000२0,0000———गोटखिंडी१५/२/२0१३१४,३४,५0९१४,३४,५0९———पुनवत ३/१/२0१३५0,000५0,000———आवळाई६/९/२0१३१,७३,000१,७३,000———शिरढोण २८/१0/२0१३७,00,000७,00,000———मुचंडी २६/५/२0१४१,00,000१,00,000———तुंग २१/७/२0१४२६,९८,७00६,१0,000२0,८८,७00चिकुर्डे१४/६/२0१४२२,000२२,000———घरनिकी१९/११/२0१४११,९0,७३४११,९0,७३४———मणेराजुरी१५/९/२0१५९,२0,000———९,२0,000एकूण १,४४,४0,५११८६,१९,0११५८,२१,५00