शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
3
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
4
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
5
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
6
हायप्रेशर स्टील ट्यूब फुटली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; ७०० डिग्री वाफेने वेढलं अन् १७ जणांचा कोळसा झाला
7
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
8
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
9
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
10
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
11
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
12
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
14
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
15
Video - इन्स्टा रीलमुळे वाचला जीव; बोट दुर्घटनेवेळी मृत्यूशी झुंज, महिलेने सांगितला थरारक प्रसंग
16
Travel: ओमानमध्ये भारताचे १० हजार रूपये घेऊन जाताय; इतक्या पैशात काय काय खरेदी करू शकाल?
17
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
19
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
20
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
Daily Top 2Weekly Top 5

इस्लामपुरात वीकेंडमध्येही संचारबंदीला खो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:24 IST

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली सोशल डिस्टन्सचा फज्जा. अशोक पाटील लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : राज्यात ...

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली सोशल डिस्टन्सचा फज्जा.

अशोक पाटील

लोकमत न्यूज नेटवर्क

इस्लामपूर : राज्यात संचारबंदी असतानाही आठवड्यातील सलग पाच दिवस रस्त्यांवर नागरिकांची वर्दळ असते. शनिवार, रविवारी वीकेंडला नागरिक घरात बसतील तर नवलच. या दिवशीही नागरिकांनी संचारबंदीला खो दिला आहे. रुग्णांना उपचारासाठी बेड नाहीत. अनधिकृत उपचार करणाऱ्या डॉक्टरांकडे कोरोना रुग्ण वाढत आहेत. त्यांच्याबरोबर नातेवाईक असतात. हेच नातेवाईक भाजीपाला, औषध दुकाने, रुग्णालय परिसरात बेधडकपणे वावरतात. त्यामुळे कोरोनाला आमंत्रण मिळत आहे.

शहरात कोविड केंद्रासह सर्व खासगी रुग्णालयांचे बेड फुल्ल असल्याने बहुतांशी रुग्ण आता आपल्या फॅमिली डॉक्टरकडे उपचार घेऊन घरीच थांबत आहेत. असे रुग्ण विविध तपासण्या करण्यासाठी लॅब आणि औषध दुकान परिसरात वावरताना दिसतात. त्यामुळे यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात कोरोना पसरत आहे. या रुग्णांवर पालिका, आरोग्य विभाग आदींचे नियंत्रण नाही.

राज्य सरकारने पहिल्या टप्प्यात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी आठवड्यातील शनिवारी आणि रविवार या दोन दिवशी संचारबंदीचे आदेश दिले होते. या काळातही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला. त्यामुळे पंधरा दिवसांचा पूर्णपणे लॉकडाऊन करण्यात आला. तरीसुद्धा वीकेंडला नागरिक रस्त्यावर मोठ्या प्रमाणात दिसू लागले आहेत. या दिवशी तरी मेडिकल वगळता सर्व व्यवहार बंद ठेवावेत, जेणेकरून कोरोनाची साखळी तुटेल.

कोट

वीस दिवसांत रुग्णांच्या तपासणीत १०० ते १२० रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह सापडले. यातील ९० टक्क्यांहून अधिक रुग्ण घरीच राहून औषधोपचार करत आहेत. उर्वरित कोविड केंद्रावर उपचारासाठी दाखल झाले आहेत. घरी उपचार घेणाऱ्या रुग्णांमुळे त्यांच्या घरातील नातेवाइकांना संसर्ग होऊ शकतो.

- डॉ. अतुल मोरे, इस्लामपूर