शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

Sangli Crime: मृत व्यक्ती जिवंत दाखवून विमा कंपनीला १६ लाखांचा गंडा, सहाजणांवर गुन्हा दाखल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2025 17:47 IST

विमा दावा मंजूर केला. परंतु, नंतर हा प्रकार लक्षात आला.

कोकरूड : आंबाबाईचीवाडी (हत्तेगाव, ता. शिराळा) येथील मृत व्यक्ती जिवंत भासवून त्याचा विमा उतरवून तो पुन्हा हार्ट अटॅकने मृत झाल्याचे दाखवून विमा कंपनीची १६ लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत विमा कंपनीने सहाजणांविरुद्ध कोकरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.संशयित विमा प्रतिनिधी कोमल संतोष दराडे (रा. कदम चाळ, करपेवाडी पूर्व, ठाणे), विमा पॉलिसी वारसदार लक्ष्मी भगवान अस्वले (वय ३६, रा. हातेगाव), एजन्सीचा तपास अधिकारी अझर रहमुल अलम (रा. नाॅनपारा, सराईघर, जि. सुपाऊल, बिहार), शिंदेवाडी-मांगरूळचा ग्रामसेवक राजेंद्र विलास काळे (रा. शिराळे खुर्द), माऊली हॉस्पिटल कोकरूडचा डॉ. प्रशांत डी. ठोंबरे (रा. कोकरूड), हत्तेगावचा पोलिस पाटील विठ्ठल पांडुरंग उंडाळकर (रा. हत्तेगाव) यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, आंबाबाईचीवाडी येथील भगवान ज्ञानदेव अस्वले यांचा २० मार्च २०२३ रोजी मृत्यू झाला आहे. मात्र, एका खासगी विमा कंपनीच्या प्रतिनिधी कोमल दराडे हिने लक्ष्मी अस्वले यांना आर्थिक आमिष दाखवले. अस्वले यांचे मृत पती भगवान ज्ञानदेव अस्वले यांचे दि. २० मार्च २०२३ रोजी निधन झाले.

परंतु, ते जिवंत असल्याचे भासवून त्यांच्या जागी दुसऱ्याच व्यक्तीचा फोटो काढून विमा कंपनीच्या टॅबवरून निश्चित समृद्धी प्लॅन हा विमा दि. २० डिसेंबर २०२४ रोजी उतरवला. त्यानंतर अस्वले यांचा दि. १० फेब्रुवारी २०२५ रोजी हार्ट अटॅकने मृत्यू झाल्याचे भासवले. विमा रकमेसाठी कंपनीकडे ११ फेब्रुवारी २०२५ रोजी क्लेम केला. कंपनीकडून विमा रक्कम हडप करण्यासाठी संशयितांनी संगनमत केले. ग्लोबल इन्व्हेस्टिगेशन कंपनीचा प्रतिनिधी अझर अलम याने स्थानिक सर्वेक्षण करून वारसांनी क्लेमसाठी दिलेली कागदपत्रे खरी असल्याबाबत चुकीचा अहवाल विमा कंपनीकडे दिला. शिंदेवाडीचा तत्कालीन ग्रामसेवक राजेंद्र काळे याने अस्वले हे दि. १० फेब्रुवारी रोजी राहते घरी मृत झाल्याचा मृत्यूचा दाखला दिला, तर डॉ. प्रशांत ठोंबरे याने अस्वले हे घरी मृत झाले असून त्यांची घरी जाऊन तपासणी केल्याबाबतचे प्रमाणपत्र दिले. तसेच हत्तेगावचा पोलिस पाटील उंडाळकर याने अस्वले यांच्यावर शिंदेवाडी गावात अंत्यसंस्कार केल्याचा चुकीचा दाखला दिला.विमा कंपनीने प्रतिनिधी, वारसदार व इतर संशयितांवर विश्वास ठेवून १६ लाख २ हजार ६१० रुपयांचा विमा दावा मंजूर केला. परंतु, नंतर हा प्रकार लक्षात आला. त्यामुळे संबंधितांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.

चौकशीत पर्दाफाशविमा कंपनीने केलेल्या पडताळणीत प्रतिनिधीसह सहाजणांनी संगनमत करून पैसे हडप करण्याचा डाव रचल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे उपव्यवस्थापक वासुदेव दिगंबर टिकम (रा. विक्रोळी, मुंबई) यांनी दि. २९ रोजी कोकरूड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

English
हिंदी सारांश
Web Title : Sangli: Insurance fraud of ₹16 lakh by faking death busted.

Web Summary : In Sangli, a group defrauded an insurance company of ₹16 lakh by falsely claiming a dead man was alive and then died again. Six individuals, including a gram sevak and doctor, have been charged.