शहरं
Join us  
Trending Stories
1
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
2
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
3
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
4
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
5
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
6
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
7
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
8
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
9
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
10
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
11
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
12
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
13
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
14
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
15
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
16
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
17
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
18
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
19
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
20
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
Daily Top 2Weekly Top 5

कदमांवर टीका करण्याऐवजी जत तालुक्याचे प्रश्न सोडवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2015 22:50 IST

काँग्रेसचा जगतापांना टोला : पाणी प्रश्न मार्गी लावा

जत : आ. विलासराव जगताप यांनी भारती विद्यापीठाची नाहक बदनामी करण्यापेक्षा तालुक्यातील विकासकामांवर लक्ष केंद्रित करून पाण्याचा प्रश्न निकालात काढावा, अशी टीका जत तालुका कॉँग्रेसचे अध्यक्ष पी. एम. पाटील यांनी केली आहे. ते म्हणाले की, जगताप यांनी तालुक्यातील चारा, पाणी, वीज दाबनियमन, विभाजन या प्रमुख महत्त्वाच्या प्रश्नांवर विधानसभेत कितीवेळा आवाज उठविला आहे किंवा संबंधित विभागाच्या मंत्र्यांकडे कितीवेळा कामाचा पाठपुरावा केला आहे, हे त्यांनी जाहीर करावे. आ. पतंगराव कदम यांनी भारती विद्यापीठाच्या माध्यमातून रुग्ण सुविधा, विविध शैक्षणिक सुविधा माफक दरात उपलब्ध केल्या आहेत. आ. विलासराव जगताप यांची लोकप्रियता कमी झाली आहे. त्यामुळे आ. पतंगराव कदम यांच्यावर खोटे आरोप करून ते प्रसिद्धी मिळविण्याचा प्रयत्न करत आहेत. भारती विद्यापीठ जमीन खरेदी प्रकरणाची प्रशासकीय पातळीवर चौकशी करावी. परंतु नाहक बदनामी करू नये, असेही म्हटले आहे.बिरनाळ, शेगाव साठवण तलाव पाणी पूजन व विविध रस्ते आणि इतर कामे आघाडी शासनाच्या कार्यकाळात मंजूर होऊन त्यासाठी त्यावेळी आर्थिक तरतूद करण्यात आली होती. परंतु या कामाचे फुकटचे श्रेय आ. विलासराव जगताप घेत आहेत, असा आरोप प्रसिद्धीपत्रकात करण्यात आला आहे. जत पंचायत समितीवर भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे का, राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाची सत्ता आहे, ते समजून येत नाही. जर तेथे भाजपची सत्ता असेल, तर त्यांनी तसे जाहीर करावे. स्वार्थासाठी पक्षाचा वापर करून जगताप यांनी आमदारकी मिळविली आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांची पक्षनिष्ठा किती आहे, ते तपासून पहावे, असे आवाहनही केले आहे. यावेळी बाजार समिती सभापती संतोष पाटील, जिल्हा बॅँकेचे संचालक विक्रम सावंत, पंचायत समिती सदस्य पिराप्पा माळी, मल्लेश कत्ती, नगरसेवक सुजय शिंदे, मोहन कुलकर्णी व रवींद्र सावंत, बाबासाहेब कोडग, आप्पाराया बिराजदार आदी उपस्थित होते. (वार्ताहर)खोट्या आश्वासनांबद्दल जगतापांनी खुलासा करावाउमदी येथील पाणी संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांना आमदारांनी खोटे आश्वासन देऊन त्यांची फसवणूक केली आहे. यासंदर्भात त्यांनी खुलासा करावाग्रामपंचायत, जिल्हा बॅँक, बाजार समिती निवडणूक याठिकाणी आ. जगताप यांना हार पत्करावी लागल्यामुळे ते बेताल आरोप करीत असल्याचा आरोप पाटील यांनी केला.