शहरं
Join us  
Trending Stories
1
"रशिया-युक्रेन युद्ध अखेरच्या टप्प्यात.."; पुतिन यांचे संकेत, ३ दिवसांच्या युद्धविरामाची घोषणा
2
टीसीएस' प्रकरण: निदा खानसोबत 'स्पॉट पंचनामा', नाशिक पोलिस आयुक्तालयात कुटुंबीयांचीही चौकशी
3
आजचे राशीभविष्य, १० मे २०२६: 'या' २ राशीच्या लोकांनी रागावर नियंत्रण ठेवा, अचानक खर्च होईल पैसा
4
'आधार'मधील बायोमेट्रिक 'त्रुटीभार' नागरिकांवर नको; मुंबई उच्च न्यायालयाने दिले 'यूआयडीएआय'ला निर्देश
5
हरयाणा ते बंगाल : मोदींच्या नेतृत्वात ९ राज्यांत भाजपाचे मुख्यमंत्री; अस्तित्व नसलेल्या राज्यांत रोवले भक्कम पाय
6
बोगस दिव्यांग कर्मचाऱ्यांवर उच्च न्यायालयाचा बडगा! राज्यात १२० दिवसांत पडताळणी अनिवार्य
7
विशेष लेख: विरोधी पक्ष दिसला तर लाखाचे बक्षीस द्यायचे का?
8
तामिळनाडूचा तिढा सुटला; 'टीव्हीके'ने जुळवले बहुमताचे समीकरण, विजय होणार नवे मुख्यमंत्री 
9
९४ हजार विद्यार्थ्यी मराठी विषयात नापास, अभिजात दर्जा मिळालेल्या मराठीत अपयश ही धोक्याची घंटा
10
प्रिमियम एफएसआयला सुप्रीम कोर्टाची स्थगिती, शेतकऱ्यांना 'टीडीआर'च्या माध्यमातून दिलासा
11
रशिया-युक्रेनमध्ये ३ दिवसांचा युद्धविराम; ट्रम्प यांच्या मध्यस्थीला यश, १ हजार कैद्यांची अदलाबदल
12
पश्चिम बंगालमध्ये भाजप सरकार स्थापन, पंतप्रधानांसह एनडीएच्या २० मुख्यमंत्र्यांची उपस्थिती
13
अनिल अंबानींच्या एडीए समूहावर छापा; 'सर्च वॉरंट'च्या आधारे कारवाईचा बडगा
14
हंटाव्हायरस : जहाज स्पेनला आज पोहोचेल; १४०हून अधिक प्रवासी आणि कर्मचारी
15
दिल्लीला हाय अलर्ट! आत्मघाती दहशतवादी हल्ल्याची शक्यता; BJP मुख्यालय, सरकारी कार्यालये रडारवर
16
लखनौमध्ये भाजप नेत्यावर गोळीबार, प्रकृती चिंताजनक; ट्रामा सेंटरबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी
17
डोकं वापरा...! नेहराचा मास्टरस्ट्रोक अन् DSP सिराजनं वैभव सूर्यवंशीसमोर दाखवलं मॅजिक (VIDEO)
18
मोठी बातमी! खासदार सुप्रिया सुळे यांच्या कारला अपघात, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील घटना
19
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या TMC नं केली विरोधी पक्षनेत्याची घोषणा, कुणाला मिळाली जबाबदारी?
20
'करामती' खानच्या फिरकीची जादू; यशस्वीच्या नेतृत्वाखाली RR अपयशी, विक्रमी विजयासह GT नं मारली मुसंडी
Daily Top 2Weekly Top 5

आष्टा येथे आज ‘जयंत अ‍ॅग्रो’ प्रदर्शनाचे उद्घाटन

By admin | Updated: February 15, 2015 23:47 IST

दिलीप वळसे-पाटील यांची उपस्थिती : बुधवारपर्यंत विविध उपक्रमांचे आयोजन

आष्टा : माजी ग्रामविकासमंत्री, आमदार जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आष्टा येथील आर्टस् अँड कॉमर्स कॉलेजच्या प्रांगणात आयोजित चौथ्या ‘जयंत अ‍ॅग्रो २0१५’ या राज्यस्तरीय कृषी, औद्योगिक व पशू-पक्षी प्रदर्शनाचे उद्घाटन सोमवारी सकाळी ११ वाजता विधानसभेचे माजी सभापती आमदार दिलीप वळसे-पाटील यांच्याहस्ते होत आहे़ आमदार जयंत पाटील, समारंभाचे अध्यक्ष व माजी आमदार विलासराव शिंदे, नगराध्यक्षा सौ़ मंगलादेवी शिंदे, ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ डॉ़ रामचंद्र साबळे यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा होत आहे़ रविवारी सर्व जातींच्या वाड्यासह, अखंड मुळासह ऊस स्पर्धा, भाजीपाला पीक प्रदर्शन व स्पर्धा उत्साहात पार पडल्या. सोमवारी गाय, म्हैस, बैल प्रदर्शन, शेळी, मेंढी व पक्षी प्रदर्शन, तसेच पुष्प प्रदर्शन व स्पर्धा, केळी घड प्रदर्शन व स्पर्धा होणार आहेत़ रात्री सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे़ मंगळवारी गाय, म्हैस, बैल प्रदर्शन व स्पर्धा, शेळी, मेंढी, पक्षी प्रदर्शन स्पर्धा, नावीन्यपूर्ण कृषी औजारे निर्मिती स्पर्धा आणि हॉर्स शो होणार आहे़ बुधवारी डॉग शो, बक्षीस वितरण आणि प्रदर्शनाचा समारोप होणार आहे. प्रदर्शनाच्या चारही दिवस धान्य महोत्सव होणार आहे.कॉलेजच्या प्रांगणात अडीच एकरात सुपर स्ट्रक्चर मंडप घातला आहे़ यामध्ये ८0 बाय १00 ची ३ सुपर स्ट्रक्चर उभी केली आहेत़ प्रवेशद्वारात ‘स्फूर्तिस्थळ’ ही नवी संकल्पना उभारली आहे़ यामध्ये राजारामबापूंनी स्थापन केलेल्या व आ. जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी घोडदौड करणाऱ्या संस्था, पाणी पुरवठा संस्था आदींच्या माध्यमातून झालेली वाळवा तालुक्याची प्रगती अधोरेखीत केली आहे.
या प्रदर्शनात ‘अपारंपरिक ऊर्जा पार्क’ हे विशेष आकर्षण आहे. उद्घाटन, सांस्कृतिक कार्यक्रम, बक्षीस वितरण समारंभासाठी स्वतंत्र मंडप उभारला आहे़ येथे २ हजार लोकांची बैठक व्यवस्था आहे. जनावरांच्या प्रदर्शनासाठीही स्वतंत्र मंडप उभारला आहे.
जयंत अ‍ॅग्रोचे अध्यक्ष रामरावतात्या देशमुख, राजारामबापू साखर कारखान्याचे अध्यक्ष पी़ आऱ पाटील, राजारामबापू बँकेचे अध्यक्ष प्रा़ शामराव पाटील, दूध संघाचे अध्यक्ष नेताजीराव पाटील, आनंदराव पाटील, कृषी पदवीधर संघाचे अध्यक्ष बी़ डी़ पवार, शिक्षण संस्थेचे सचिव आऱ डी़ सावंत, प्राचार्य डॉ़ विलास काळे, आष्ट्याचे संग्राम फडतरे, संदीप गिड्डे, डी़ आऱ पाटील, प्रेमचंद कमलाकर प्रदर्शनाच्या यशस्वितेसाठी परिश्रम घेत आहेत़ या प्रदर्शनामध्ये महाराष्ट्र शासन व सांगली जिल्हा परिषदेचा कृषी आणि पशू विभागही सहभागी आहे. (वार्ताहर)