शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Sangli Municipal Election Results 2026: मिरजेत चूरशीची लढतीत राष्ट्रवादी अजितदादा गटाच्या उमेदवाराचा केवळ १० मतांनी विजय, भाजपच्या छाया जाधव पराभूत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2026 14:23 IST

छाया जाधव यांच्या सारख्या नवख्या उमेदवाराने शैला दुर्वे यांना चांगलेच झुंजविले

मिरज : महापालिकेच्या निवडणुकीत मिरजेत सात प्रभागात लढत झाली असली तरी सर्वांचे लक्ष लागलेल्या प्रभाग तीन मधील चूरशीची लढत राष्ट्रवादी अजितदादा गटाच्या शैला शिवाजी दुर्वे  यांनी केवळ 10 मतांनी जिंकली. त्यांनी निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये प्रवेश करून उमेदवारी मिळविलेल्या छाया सचिन जाधव यांचा पराभव केला. प्रभाग क्रमांक तीनमध्ये ही लढत झाली. राष्ट्रवादी अजितदादा गटाच्या शैला दुर्वे व रेश्मा चौधरी या दोन महिला येथे विजयी ठरल्या. भाजपचे माजी नगरसेवक शिवाजी दुर्वे यांनी यावेळी राष्ट्रवादीत प्रवेश करून आमदार सुरेश खाडे यांना आव्हान दिले होते. निवडणुकीत प्रभागात भाजपची हवा होती. मात्र शिवाजी दुर्वे यांनी प्रभागात  वर्चस्व असल्याचे दाखवून दिले. मतमोजणी सुरु झाल्यापासून शैला दुर्वे  आघाडीवर होत्या.  मात्र नंतर छाया जाधव यांनी ही आघाडी कमी केल्याने अखेरच्या काही फेऱ्यात नेक टू नेक सुरु होते. मात्र मतदारांशी संपर्क असल्याने  निवडणूक जिंकता येते याचेच प्रत्यंतर या दुर्वे यांच्या विजयातून आले.मिरजेत प्रभाग तीन मधील या लढतीला महत्व होते. आमदार सुरेश खाडे व भाजप नेते सुरेश आवटी यांना आव्हान देऊन दुर्वे यांनी पत्नीला राष्ट्रवादी अजितदादा गटातर्फे रिंगणात उतरवले होते.  निवडणुकीपूर्वी भाजप सोडून पक्षांतर केल्याने मतदारांत संमिश्र भावना होत्या. माजी खासदार संजयकाका पाटील यांनीही प्रभागातील राष्ट्रवादी उमेदवारांचा प्रचार केला. मात्र या प्रभागात समोर भाजपची बलाढ्य यंत्रणा असल्याने येथे विजयी कोण होते याकडे शहराचे लक्ष लागले होते. दुर्वे याचे प्रभागात वर्चस्व असले तरी छाया जाधव यांच्या सारख्या नवख्या उमेदवाराने शैला दुर्वे यांना चांगलेच झुंजविले. या बिग फाईट मध्ये दुर्वे यांनी  बाजी मारल्याने त्यांच्या समर्थकांनी  विजयाचा जल्लोष केला.

English
हिंदी सारांश
Web Title : NCP's Durve wins Miraj election by 10 votes, defeats BJP.

Web Summary : In Miraj, NCP's Shaila Durve won ward three by a narrow margin of 10 votes, defeating BJP's Chhaya Jadhav. Despite a strong BJP presence and Jadhav's challenge, Durve's established influence secured her victory, celebrated by supporters.
टॅग्स :Sangli Miraj Kupwad Municipal Corporation Electionसांगली मिरज कुपवड महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६SangliसांगलीMunicipal Electionमहाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०२६NCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवारBJPभाजपा