राष्ट्रीय सेवा योजना विद्यार्थ्यांसाठी महत्वपूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:27 IST2021-09-25T04:27:40+5:302021-09-25T04:27:40+5:30

मिरजेत कन्या महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिनानिमित्त राष्ट्रीय सेवा योजना व व्यक्तिमत्त्व विकास या विषयावर प्रा. ठिगळे ...

Important for National Service Plan students | राष्ट्रीय सेवा योजना विद्यार्थ्यांसाठी महत्वपूर्ण

राष्ट्रीय सेवा योजना विद्यार्थ्यांसाठी महत्वपूर्ण

मिरजेत कन्या महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिनानिमित्त राष्ट्रीय सेवा योजना व व्यक्तिमत्त्व विकास या विषयावर प्रा. ठिगळे यांचे व्याख्यान झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्या डॉ. शर्वरी कुलकर्णी होत्या.

संजय ठिगळे म्हणाले, देशाचा आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक विकास घडविण्यात राष्ट्रीय सेवा योजना उपक्रमाची महत्त्वाची भूमिका आहे. युवकांचे व्यक्तिमत्त्व घडवताना तरुणांमध्ये सामाजिक बांधिलकीची जाण व सेवाभाव निर्माण करण्याचे काम महाविद्यालयीन स्तरावर राष्ट्रीय सेवा योजना उपक्रमाद्वारे होत आहे. युवाशक्तिचा उपयोग राष्ट्राला होण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेद्धारे कार्य सुरु आहे.

राष्ट्रीय सेवा योजना विभागप्रमुख प्रा. डॉ. सागर लटके-पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. प्रा. तुषार पाटील यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. यावेळी संस्थेचे सचिव राजू झाडबुके, डॉ. जयकुमार चंदनशिवे, व स्वयंसेविका उपस्थित होत्या. प्रा. विनायक वनमोरे, डॉ. विनायक पवार यांनी संयोजन केले. प्रा. विश्वनाथ वनमोरे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. शबाना हळंगळी यांनी आभार मानले. प्रा. शबाना हळंगळी यांनी आभार मानले.

Web Title: Important for National Service Plan students