शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्याप्रमाणे ऑक्सिजन प्रकल्प राबवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:26 IST

सांगली : ऑक्सिजनअभावी कोरोना रुग्णांचे मृत्यू होऊ नयेत, यासाठी ठाणे महापालिकेच्या धर्तीवर सांगली महापालिकेने ऑक्सिजन प्रकल्प उभारावा, अशी मागणी ...

सांगली : ऑक्सिजनअभावी कोरोना रुग्णांचे मृत्यू होऊ नयेत, यासाठी ठाणे महापालिकेच्या धर्तीवर सांगली महापालिकेने ऑक्सिजन प्रकल्प उभारावा, अशी मागणी कोरोना रुग्ण सहाय्य व समन्वय समितीचे सतीश साखळकर यांनी केली आहे.

प्राणवायूचा (ऑक्सिजन) होणारा मर्यादित पुरवठा आणि त्यामुळे होणारी रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी ठाणे महानगरपालिकेने ऑक्सिजन निर्माण करणारे दोन प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्या धर्तीवर सांगलीत ऑक्सिजन प्रकल्प उभारावा, असे साखळकर यांनी म्हटले आहे.

गडहिंग्लज (जि. कोल्हापूर) प्राथमिक आरोग्य केंद्रात ऑक्सिजन प्रकल्प उभारला आहे. सांगली जिल्ह्यातही प्राथमिक आरोग्य केंद्र, मिरज सिव्हील, सांगली सिव्हील व गरजेच्या ठिकाणी अशा पद्धतीचे ऑक्सिजन प्रकल्प उभे करण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करावेत. सद्यस्थिती व भविष्यात जिल्ह्यातील रुग्णांचे ऑक्सिजनअभावी मृत्यू होणार नाहीत, यासाठी दूरदृष्टी ठेऊन लोकोपयोगी निर्णय घ्यावा. जनतेला दिलासा द्यावा अशी मागणी पालकमंत्री जयंत पाटील यांच्याकडे केली आहे, अशी माहिती साखळकर यांनी दिली.

कोरोनाची दुसरी लाट संपेपर्यंत राज्यात सरसकट ‘एचआरसीटी’ तपासणी सवलतीच्या दरात व्हावी. त्यासाठी शासनाने सुधारित परिपत्रक काढावे, अशी मागणी साखळकर यांनी केली आहे.

रेल्वेच्या बोगी आणून १०० बेडचे कोरोना सेंटर सुरू करावे. सांगली सिव्हील हॉस्पिटलमधील डॉक्टर आणि इतर आरोग्य कर्मचारी यांची नियुक्ती करावी, अशी मागणी सतीश साखळकर यांनी केली आहे.