महापालिका क्षेत्रात विसर्जन मार्ग खड्डेमुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:31 IST2021-09-14T04:31:58+5:302021-09-14T04:31:58+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : महापालिका क्षेत्रातील प्रमुख मार्गावरील खड्डे बुजविण्याचे काम ९० टक्के पूर्ण झाले आहे. गणेश विसर्जन ...

Immersion route in municipal area pit free | महापालिका क्षेत्रात विसर्जन मार्ग खड्डेमुक्त

महापालिका क्षेत्रात विसर्जन मार्ग खड्डेमुक्त

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : महापालिका क्षेत्रातील प्रमुख मार्गावरील खड्डे बुजविण्याचे काम ९० टक्के पूर्ण झाले आहे. गणेश विसर्जन मार्ग खड्डेमुक्त करण्यात आल्याची माहिती आयुक्त नितीन कापडणीस यांनी सोमवारी दिली.

कापडणीस म्हणाले की, महापालिका क्षेत्रात प्रमुखमार्गावर गणेश विसर्जनासाठी नागरिक नदीपात्राकडे जात असतात.प्रशासनाने विसर्जन मार्गावर कुठेही खड्डा राहणार नाही याची दक्षता घेतली आहे. शहरात चार पथकाद्वारे खड्डे मुरमाने भरले आहेत. त्यावर रोलिंग केले आहे. पाचव्या दिवसापासून अनंत चतुर्दशीपर्यंत विसर्जनासाठी जाणाऱ्या गणेशभक्तांना खड्ड्यांचा सामना करावा लागणार नाही. खड्डे बुजविण्यासाठी अतिरिक्त आयुक्त दत्तात्रय लांघी, उपायुक्त राहुल रोकडे, चंद्रकांत आडके, शहर अभियंता संजय देसाई , वैभव वाघमारे, आप्पा अलकुडे यांच्यासह सर्व सहायक आयुक्तांचे पथक कार्यरत आहे. पाऊस थांबताच याच खड्ड्यांचे डांबरी पॅचवर्क केले जाणार आहे. माझी वसुंधरा अभियान आणि स्वच्छ सर्वेक्षणामध्ये महापालिका चांगल्या पद्धतीने काम करीत आहे. त्यामुळे यंदाही भाविकांनी गणेश मूर्तीचे विसर्जन नदीपात्रात न करता महापालिकेने उभारलेल्या कृत्रिम विसर्जन कुंडात करावे. तसेच निर्माल्यही कुंडात देऊन पर्यावरणाचे रक्षण करावे असे आवाहन आयुक्त कापडणीस यांनी आहे.

Web Title: Immersion route in municipal area pit free