शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
3
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
4
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
5
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
6
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
7
Latest Marathi News LIVE Updates: राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा १ जूनपासून मोफत; प्रताप सरनाईक यांची घोषणा
8
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
9
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
10
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
11
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
12
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
13
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
15
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
16
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
17
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
18
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
19
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
20
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

बेकायदा वन उत्पादन वाहतूक जोमात : वन विभाग कोमात

By admin | Updated: December 29, 2014 23:53 IST

चेकपोस्ट नसल्याचा परिणाम : इमारत बांधली, पण कर्मचारी नाहीत; इमारतीचे उद्घाटनही रखडले

गजानन पाटील - दरीबडची = वन विभागाच्या दुर्लक्षाने मुचंडी (ता. जत) येथील आंतरराज्य चेकपोस्ट गेल्या ४ वर्षांपासून बंद आहे. मुचंडी-जत रस्त्यावरील पाण्याच्या टाकीलगत १५ लाख रुपये खर्चून २०११ मध्ये सुसज्ज अशी इमारत बांधण्यात आली आहे. वनक्षेत्रपाल अधिकाऱ्यांनी विभागाकडे पाठपुरावा करून चेकपोस्ट सुरू करण्यासाठी ठोस प्रयत्न न केल्याने शासनदरबारी गेल्या ३ वर्षांपासून भिजत घोंगडे पडले आहे. चेकपोस्ट नसल्याने परस्पर लाकडी कोळसा, लिंब, तमालपत्र, बांबू, विडी पत्ता या वन उत्पादनांची वाहतूक मोठ्या प्रमाणात होते. लाकडी कोळसा दुचाकीने येऊन व्यापारी पास घेऊन जातात. चोरटी वाहतूक मोठ्या प्रमाणात चालते.चेकपोस्ट सुरू न झाल्यामुळे शासनाचे लाखो रुपये पाण्यात गेले आहेत. आंतरराज्य चेकपोस्टसाठी ८ कर्मचाऱ्यांची मंजुरी आहे. त्यामध्ये तीन हवालदार, तीन गार्ड, दोन वॉचमन अशी कर्मचारी संख्या आहे. आंतरराज्य चेकपोस्टसाठी २०११ मध्ये विजापूर-गुहागर मार्गावरील जत रस्त्यालगत पाण्याच्या टाकीजवळ १५ लाख रुपये खर्चून सुसज्ज इमारत बांधण्यात आली आहे. कार्यालय, जप्ती माल गोदाम, विश्रांतीगृह बांधण्यात आले आहे. सभोवती तारेचे कुंपण घालण्यात आले आहे.आंतरराज्य चेकपोस्ट बंद असल्याने जतमधून गाड्यांना पास दिला जातो. जादा रकमेची आकारणी केली जाते. प्रत्येक गाड्याकडून ८०० ते १००० रुपयांची आकारणी केली जाते. पावती मात्र १०० रुपयाची दिली जाते. वनक्षेत्रपाल मर्जीतील कर्मचाऱ्यांची नेमणूक करतात. हा कर्मचारी हॉटेल, अन्य ठिकाणी थांबून गाड्यांना पास देतो. अवैध वाहतूक व्यापाऱ्यांकडून मोठी रक्कम मिळते. चेकपोस्ट सुरू झाल्यास स्वतंत्र विभाग कार्यरत होणार आहे. महसूल, अन्य रकमेची वसुली त्यांच्याकडून होईल. वसुली रक्कम विभागली जाईल. जादा माया मिळणार नाही म्हणून चेकपोस्ट सुरू करण्यास उत्सुक नाहीत. इमारतीचे उद्घाटनही झालेले नाही.इमारत पूर्ण होऊनसुध्दा आंतरराज्य चेकपोस्ट सुरू झालेले नाही. चेकपोस्ट सुरू झाल्यास अवैध वन उत्पादन वाहतुकीला आळा बसेल. शासनाला महसूल व्यवस्थित मिळेल. वन विभागाने त्वरित चेकपोस्ट सुरू करावा.- रमेश पाटील, मुचंडी, माजी जि. प. सदस्य.आंतरराज्य चेकपोस्ट सुरू करण्यासाठी वन विभागाकडे जादा कर्मचाऱ्यांची मागणी करण्यात आली आहे. नवीन पदाला मंजुरी मिळाल्यावर चेकपोस्ट सुरू होणार आहे. प्रस्ताव पाठवून दिला आहे. पाठपुरावा सुरू आहे.- सदाशिव यादव, वनक्षेत्रपाल, जत (प्रादेशिक)