Sangli: दोन कारची समोरासमोर धडक; अपघातात पती-पत्नी जागीच ठार, ५ जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2025 12:40 IST2025-03-21T12:38:49+5:302025-03-21T12:40:41+5:30

मोहन मोहिते  वांगी : वांगी (ता . कडेगांव) येथील वाल्मीक नगर येथे जुना सांगली - सातारा रस्त्यावर दोन कारमध्ये ...

Husband and wife died on the spot in a collision between two cars at Vangi on the Old Sangli Satara road | Sangli: दोन कारची समोरासमोर धडक; अपघातात पती-पत्नी जागीच ठार, ५ जण जखमी

Sangli: दोन कारची समोरासमोर धडक; अपघातात पती-पत्नी जागीच ठार, ५ जण जखमी

मोहन मोहिते 

वांगी : वांगी (ता . कडेगांव) येथील वाल्मीक नगर येथे जुना सांगली - सातारा रस्त्यावर दोन कारमध्ये झालेल्या भीषण धडकेत पती-पत्नी जागीच ठार झाले. विकास मोहिते (वय ४५) व पुष्पा मोहिते (३८, रा. खटाव, जि . सातारा) अशी मृतांची नावे आहेत. तर ५ जण गंभीर जखमी झाले. काल, गुरुवारी (दि.२०) रात्रीच्या सुमारास हा अपघात झाला.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, विकास भिकू मोहिते हे आपल्या कार क्रमांक (एमएच-४२-ए एच-१०४७ )मधून काल, गुरुवार रात्री ११ .४५ दरम्यान ताकारी येथील कार्यक्रम आटपून आपल्या पत्नी व नातेवाईकसह गावी खटावकडे चालले होते. तर जमीर ईलाही आवटी (रा . महाबळेश्वर जि. सातारा) हा महाबळेश्वरकडुन कडेपुर - वांगी मार्गे सांगलीला कार क्रमांक (एमएच-११-डीबी-५७९७) निघाले होते. वाल्मिकी नगर येथे जमीर आवटी याने भरधाव वेगात समोरून येणाऱ्या कारला जोराची धडक दिली. 

या भीषण धडकेत विकास मोहिते व पत्नी पुष्पा मोहिते हे जागीच ठार झाले. तर ऋतुजा रोहित तोरसे, विजया प्रकाश तोरसे, आरोही रोहीत तोरसे, आर्या अरुण तोरसे  हे गंभीर जखमी झाले. चालक जमीर इलाई अवटी हा ही जखमी झाला. जखमींना कराड येथे खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातात कारचे मोठे नुकसान झाले. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक योगेश शेलार करीत आहेत. 

Web Title: Husband and wife died on the spot in a collision between two cars at Vangi on the Old Sangli Satara road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.