शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
2
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
3
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
4
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
5
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
6
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
7
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
8
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
9
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
10
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
11
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
12
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
13
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
14
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
15
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
16
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
17
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
18
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
19
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
20
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
Daily Top 2Weekly Top 5

जत तालुक्यात जनावरे जगवायची कशी?

By admin | Updated: August 18, 2015 22:45 IST

थेट अनुदानाची मागणी : कडबा शेकडा दोन हजारावर, तर ऊस अडीच हजाराला टन

भागवत काटकर - शेगाव   विस्ताराने सर्वात मोठ्या असणाऱ्या जत तालुक्यात दुष्काळाची तीव्रता वाढत आहे. पावसाअभावी चाऱ्याचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत. पाण्याच्या टंचाईबरोबरच पशुधन जगविण्यासाठी चाऱ्याच्या टंचाईचाही सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे. जनावरे जगविण्यासाठी शेतकऱ्यांना आर्थिक झळ सोसावी लागत आहे. जनावरांना चाऱ्यासाठी ज्वारीचा कडबा २००० रुपये प्रति शेकडा, तर उसाचा चारा २५०० ते २८०० रुपये प्रति टन या दराने जनावरांना चारा म्हणून खरेदी करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी चारा छावण्या दुष्काळी भागात सुरू करण्याची घोषणा केली आहे. चारा छावण्या सुरू होण्याच्या कालावधीचा विचार करता, शेतकऱ्यांना थेट अनुदान देण्याचीही मागणी शेतकऱ्यांतून होऊ लागली आहे.जत तालुक्यात एकूण जनावरांची संख्या २०१२ च्या पशुगणनेनुसार ६ लाख १० हजार ६०५ आहे. मात्र पशुवैद्यकीय जाणकारांच्यामते जनावरांच्या संख्येत दोन वर्षात मोठी वाढ झाली आहे. यामध्ये गाई, बैल, म्हैशी, शेळ्या, मेंढ्या यांचा समावेश आहे. शेतीला जोडव्यवसाय म्हणून तालुक्यातील शेतकऱ्यांनी विविध पशुधनाची जोड दिली आहे. या पशुपालनातून शेतकऱ्यांना दूध, बैल, खोंड, बोकड यांच्या विक्रीतून आर्थिक उत्पन्न मिळते. शिवाय शेणखताचा वापर शेतीसाठी शेतकरी करतो. पशुधनातून तालुक्यात दररोज लाखो लिटर दूध संकलन होत आहे. मात्र चाऱ्याचे वाढते दर व पाणीटंचाईमुळे जनावरे जगवायची कशी? या काळजीत शेतकरी आहेत. खरिपाचे एकूण क्षेत्र ६५ हजार ७० हेक्टर आहे. यापैकी केवळ २३ टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. मात्र या पेरण्या पावसाअभावी पूर्णत: वाया गेल्या आहेत. आता महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी चारा छावण्या सुरू करण्यात येतील, अशी घोषणा केली आहे. राजारामबापू साखर कारखान्याच्यावतीने बनाळी येथे जिल्हा परिषद सदस्य संजीव सावंत यांच्या संस्थेने छावणी सुरू केली होती. त्या संस्थेची १७ लाख रुपये, शेगाव येथील श्रीकृष्ण पतसंस्थेची नऊ लाख, तर वाळेखिंडी विकास संस्थेची १४ लाख रुपये थकबाकी आहे. छावणी सुरू करताना जाचक अटी व नियमांचे काटेकोर पालन करावे लागते. त्यावेळी छावणी चालकांना तारेवरची कसरत करावी लागते, ही वस्तुस्थिती आहे. अशा परिस्थितीत नव्याने चारा छावण्या सुरू होणार का, याबाबत उलटसुलट चर्चा आहे. त्यातूनही काही संस्थांनी जत तहसील विभागाकडे चारा छावणीविषयी विचारणा केली आहे. महसूलमंत्र्यांनी पाण्याची सोय व चारा छावण्या सुरू करण्याची घोषणा केली असली तरी, अद्याप तशी सूचना महसूल यंत्रणेकडे आलेली नाही.यापूर्वीची बिले अद्याप थकितजत तालुक्यातील काही चारा छावणी चालकांची बिले अद्यापही शासनाकडून मिळायची आहेत. तसेच काही संस्थांचे लेखापरीक्षण होणे बाकी आहे. यामुळे ही बिले प्रलंबित आहेत. जत उत्तर भागातील तीन ठिकाणच्या चारा छावण्यांची बिले थकली आहेत. छावणी चालकांना यापूर्वी छावणी चालविताना आलेला अनुभव पाहता, ते चारा छावणी सुरू करतील का, याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. शेतकऱ्यांनी शेतीपूरक व्यवसायासाठी जिवापाड जोपासलेल्या जनावरांची काळजी घेणे गरजेचे आहे. सध्या पाणी व चाराटंचाई याची मोठी समस्या तालुक्यात निर्माण झाली आहे. तरीही चारा छावण्यांसंदर्भात शासनाने त्वरित निर्णय घेऊन, जाचक अटी व बिलांसंदर्भातील चालढकलीचे धोरण जाहीर करावे. अद्यापही जत उत्तर भागातील सुमारे ६० ते ७५ लाखांची बिले थकित आहेत, तरीही चारा छावण्या सुरू करण्याबाबत आम्ही सकारात्मक आहोत.- संजीव सावंत, जि. प. सदस्य, बनाळी, ता. जत.दुष्काळी भागातील जनावरे जगली पाहिजेत, ही आमची तळमळ आहे. शेतीला पूरक व्यवसाय म्हणून शेतकऱ्यांनी जनावरांची जोपासना केली. पण सध्या दुष्काळाची दाहकता वाढतच आहे. चारा छावण्या सुरू करण्यासंदर्भात निर्णय झाला आहे, मात्र चारा छावणी चालविताना अडचणी निर्माण होतात. शिवाय शंभर टक्के सुुविधा छावणीत मिळत नाहीत. त्यासाठी सरळ थेट अनुदान शेतकऱ्यांना देण्यासाठी शासनाकडे पुढाकार घेऊ.- सदाभाऊ खोत, प्रदेशाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना